देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत.
Devendra Fadnavis &  Governor Bhagat Singh Koshyari
Devendra Fadnavis & Governor Bhagat Singh KoshyariDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. राज्याचे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यापूर्वी फडणवीस दिल्लीत होते, तिथे त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुंबईत परतण्याच्या तयारीत असताना फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना मुंबईत परतून चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत परत येऊ शकतात, अशीही बातमी समोर येत आहे. (Devendra Fadnavis called on Governor Bhagat Singh Koshyari)

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने बहुमत गमावल्याचे महाराष्ट्र भाजपच्या (BJP) नेत्यांनी राज्यपालांना सांगितले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राजभवनात त्यांनी राज्यपालांची भेट घेतली तेव्हा भाजप नेते गिरीश महाजन आणि महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही त्यांच्यासोबत होते. दोघेही फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांना भेटण्यासाठी विमानतळावरुन थेट गेले. मिळालेल्या माहितीनुसार, आठ अपक्ष आमदारांनी त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरुन महाराष्ट्राच्या राज्यपालांना मेल पाठवला असून तत्काळ फ्लोअर टेस्टची मागणी केली आहे.

Devendra Fadnavis &  Governor Bhagat Singh Koshyari
Maharashtra Political Crisis: गुलाबराव पाटलांचा 'तो' व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांची जहरी टिका

तसेच, बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारीच मुंबईत परतण्याचे संकेत दिले होते. उद्धव ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याचे महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांना सांगितले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रात मंत्रिमंडळाच्या बैठकांच्या फेऱ्या सुरु आहेत. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठकही झाली, मात्र कोणतेही मोठे पाऊल उचलले गेले नाही. बुधवारीही मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते. तर, पडद्यामागे भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे मानले जात आहे.

Devendra Fadnavis &  Governor Bhagat Singh Koshyari
Maharashtra Political Crisis: फडणवीस आणि शिंदेंची गुजरातमध्ये गुप्त भेट

शिवाय, महाराष्ट्र राजभवनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, 'सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 30 जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु हे पत्र पूर्णपणे बनावट आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com