Sharad Pawar Death Threat: तुमचाही दाभोळकर केला जाईल; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

Sharad Pawar: शरद पवारांच्या मोतीबाग या घराबाहेर स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
Sharad Pawar Murder Threat
Sharad Pawar Murder ThreatDainik Gomantak
Published on
Updated on

Sharad Pawar Murder Threat: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

ट्विटद्वारे ही धमकी देण्यात आली असून तुमचाही दाभोळकर केला जाईल असे या धमकीत म्हटले आहे.

शरद पवारांना अशी धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या पुण्यातील घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

शरद पवारांच्या मोतीबाग या घराबाहेर स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले असून पुण्यातील कार्यालयात काही वरिष्ठ पोलिस आधिकारी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

धमकी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेंसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याची मागणी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

संजय राऊतांना धमकी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना देखील गोळी मारुन जीवे मारण्याची धमकी मारण्याची देण्यात आली आहे.

9 चा भोंगा बंद करावा नाहीतर संजय राऊतांना गोळी घातली जाईल अशी फोनद्वारे धमकी देण्यात आली आहे. संजय राऊतां( Sanjay Raut )नी फोनचे उत्तर न दिल्याने सुनिल राऊतांना हा धमकीचा फोन करण्यात आला होता.

संजय राऊतांनी यावर बोलताना राज्याची गृहमंत्र्यांची यात चूक असल्याचे म्हटले आहे. पहिल्यांदा जेव्हा संजय राऊतांना धमकी मिळाली होती तेव्हा देवेंद्र फडणवीय यांनी त्याची खिल्ली उडवली होती. या सर्वांचे परिणाम गृहमंत्र्यांना एक दिवस भोगावे लागणार आहेत असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com