क्राइम पेट्रोल आणि सावधान इंडिया फेम 2 ऐक्ट्रेसला चोरी प्रकरणी अटक

Crime Patrol and Savdhan India
Crime Patrol and Savdhan India
Published on: 
Updated on: 

मुंबई: क्राइम पेट्रोल(Crime Patrol) आणि सावधान इंडिया(Savdhan India) यासारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये(TV Show) काम करणार्‍या दोन अभिनेत्रींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या मित्राच्या घरातून 3 लाख 28 हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी(theft case) दोन्ही अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबल्यावर त्यांना पैशाची अडचण भासत होती. या दोन अभिनेत्रींचा एक मित्र मुंबईच्या गोरेगाव येथील आरे कॉलनीतील रॉयल पाम नावाच्या पॉश सोसायटीमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी खोल्या देतो. काही दिवसांपूर्वी त्या तिथे राहायला आल्या होत्या.(Crime Patrol and Savdhan India Fame 2 actress arrested in theft case)

अशाप्रकरे केले अभिनेत्रींना अटक
आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे रॉयल पाम नावाची पॉश सोसायटी आहे. 18 मे रोजी या दोन्ही अभिनेत्री एकाच सोसायटीच्या इमारतील फ्लॅटमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहायला आल्या होत्या. त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेले लाखो रुपये चोरल्यानंतर या दोन्ही अभिनेत्री रफातफा झाल्या.

आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली

संशय आल्याबरोबर, आधी राहत असेलल्या पेइंग गेस्टने आरे पोलिस ठाण्यात या दोन्ही अभिनेत्रींविरोधात तक्रार दाखल केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघीही काही उत्तर देत नव्हत्या. पण जेव्हा पोलिसांनी त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवले ज्यामध्ये त्या स्पष्टपणे पैशांनी भरलेली बॅग घेत असल्याचे दिसून आले तेव्हा ती बोलायला लागली आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पैशांच्या अभावामुळे त्यांना हे काम करावे लागत असल्याचे या दोघांनी सांगितले.

अभिनेत्रींना 23 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
सुरभी सुरेंद्र लाल श्रीवास्तव आणि मोहसीना मुख्तार शेख अशी या दोन अभिनेत्रींची नावे आहेत. सुरभीचे वय 25 वर्षे आणि मोहसीनाचे वय 19 वर्षे आहे. आरे पोलिस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार, दोघींनी 'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया' यासह अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले 50 हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले आहेत. या दोघींनाही कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 23 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com