ऑपरेशन दरम्यान, रुग्णाच्या पोटात राहिला सर्जिकल मॉप, डॉक्टर म्हणतात...

योग्य वेळी तातडीने प्रक्रिया केल्याने बाळ आणि आई दोघांचेही वाचले प्राण
crime news thane surgical mop left in patient body case filed against doctors and nurse
crime news thane surgical mop left in patient body case filed against doctors and nurseDainik Gomantak
Published on
Updated on

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या तीन डॉक्टर आणि एका नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर सिझेरियन ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या पोटात सर्जिकल मॉप सोडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनने तक्रार दाखल केली होती. (thane surgical mop left in patient body case filed against doctors and nurse)

याप्रकरणी माहिती देताना ठाणे (Thane) पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला स्वत: सातारा येथे डॉक्टर (Doctor) आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, मे 2020 मध्ये सिझेरियन केल्यानंतर तिला तीव्र वेदना जाणवत होत्या. यासंदर्भात त्यांनी सर्जन डॉ.आशुतोष आजगावकर यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांची मदत मिळाली नाही. दरम्यान, पीडितेचे सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात आल्या आणि तिच्या पोटात सर्जिकल वाइप आणि धातूची पट्टी असल्याचे आढळून आले.

crime news thane surgical mop left in patient body case filed against doctors and nurse
...म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा होतोय स्फोट

तक्रारदार महिलेने सांगितले की, या प्रचंड चुकीमुळे तिला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले, ज्यामध्ये तिचे आतडे आणि एक अंडाशय देखील खराब झाले. त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्यावर साताऱ्यात शस्त्रक्रियाही झाली होती. या प्रकरणी आता सर्जन डॉ. आशुतोष आजगावकर, सहाय्यक शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया महाजन, भूलतज्ज्ञ डॉ. चिन्मयी गडकरी आणि एका परिचारिका यांच्यावर आरोप आहेत. नियमानुसार त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची विशेष वैद्यकीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या प्रकरणी तीन डॉक्टर आणि एका नर्सवर आयपीसी कलम 308 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस (police) अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ज्युपिटर हॉस्पिटलने जारी केलेल्या निवेदनात संबंधित शल्यचिकित्सकांनी म्हटले आहे की, रुग्णाची हृदयाची गती झपाट्याने कमी होत असल्याने त्यावेळी रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते.

सर्जनने सांगितले की आई आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलाच्या जन्मापासून रुग्णाला (patient) मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी आणि हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढून टाकणे) रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्यात आल्या. योग्य वेळी तातडीने प्रक्रिया केल्याने बाळ आणि आई दोघांचेही प्राण वाचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com