मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं विघ्न - खासदार नवनीत राणा

नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलताना साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Navneet Rana
Navneet RanaDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात खासदार नवनीन राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसेचे मातोश्रीवर पठण करणार असे म्हटल्यावर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला धडा शिकवण्याची घोषणा करत खासदार राणा यांच्या घरात शिरले होते. यानंतर कायदा व्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी खासदार राणा यांना ताब्यात घेतले होते. या नाट्यमय घडामोडीनंतर खासदार नवनीन राणा आणि आमदार रवी राणा यांचे नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. ( Chief Minister Uddhav Thackeray is an obstacle for Maharashtra - MP Navneet Rana )

Navneet Rana
महाराष्ट्रात हनुमान चालिसावर पुन्हा होऊ शकतो गदारोळ

यावेळी 36 दिवसानंतर विदर्भात परतलेल्या खा. राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं विघ्न असून ते दूर व्हावं म्हणून आम्ही संकटमोचन हनुमान यांच्याकडे प्रार्थना करत आहोत, असे विधान केले आहे. यानंतर दोघांनीही रामनगर परिसरातील पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठन केले. मंदिराच्या दिशेने येताना पोलिसांना त्यांचा ताफा अडवला होता असे आरोपही यावेळी आमदार रवी राणा यांनी केले.

यानंतर माध्यमांशी संवाद साधनाता नवनीन राणा म्हणाल्या, मुख्यमंत्री विदर्भातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, लोडशेडींग, बेरोजगारी या संदर्भात मुख्यमंत्री यांनी किती बैठकी घेतल्या याचा खुलासा करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवेदकाने हनुमान यांच्या बद्दल काही प्रश्न विचारले असता राणा दामपत्याची भंबेरी उडाली होती.

हनुमान यांचा नाव हनुमान कसं पडलं. त्यांचे पूर्वीचे नाव काय होते, असे प्रश्न मुलाखतीत विचारले असता. दोघांनाही याचे उत्तर आले नसल्याचे दिसून येत होते. आज नागपूरात हनुमान चालीसा पठनाच्या घटने निमित्त हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com