World Heritage Site: आनंदाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

12 Forts Of Chatrapati Shivaji Maharaj In World Heritage List: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
12 Forts Of Chatrapati Shivaji Maharaj In World Heritage List
Forts Dainik Gomantak
Published on
Updated on

Unesco World Heritage Site: शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे ही आनंदाची बातमी दिली.

फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ''ऐतिहासिक! अभिमानास्पद!! गौरवशाली क्षण!!! आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा !!!! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन... छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले.''

जागतिक वारसा यादीतील 12 किल्ले

युनोस्कोच्या (Unesco) जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांना ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. या 12 किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी यांचा समावेश आहे. याशिवाय, तामिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजाचं वैभव

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकवण्यासाठी हे किल्ले उभारले. शत्रूची भंबेरी उडणारे हे किल्ले छत्रपतींच्या स्वराज्याचे वैभव होते. किल्ल्यांचे दरवाजे आणि माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com