राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण केल्याने कारवाई
Rana Couple
Rana CoupleDainik Gomantak

महाराष्ट्रात राणा दाम्पत्याने यांनी हनुमान चालीसा पठण मातोश्रीवर करणार असे म्हटल्यावर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला धडा शिकवण्याची घोषणा केली.व त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर खासदार राणा यांच्या अटकेनंतर हे वातावरण काहीस निवळलं होतं मात्र शिसैनिकांनी काल राणा दाम्पत्याच्या परतीच्या मार्गावर खिल्ली उडवणारे फ्लेक्स लावल्यानंतर पुन्हा आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. यातच रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण केल्याने राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Charges filed against 14 activists including Rana couple)

अमरावतीत 36 दिवसांनी परतलेल्या राणा दाम्पत्याचं काल जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि या स्वागतादरम्यान नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालिसा पठण आणि हनुमानाची आरती सुरु होती.

रात्री दहानंतर लाऊड स्पीकर्सची परवानगी नाही आहे. तरी देखील राणा समर्थकांनी लाऊड स्पीकर सुरु ठेवले होते. त्यामुळं आता अमरावती पोलीसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Rana Couple
मोहादेसा बनली शिया समाजातील पहिली व्यावसायिक पायलट

''36 दिवस पाखडले, काहीच नाही सापडले''

छत्तीस दिवस पाखडले काहीच नाही सापडले शेवटी आले येथेच अशाप्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहे. शिवसेनेचे पराग गुढगे यांनी हे पोस्टर लावलेले आहे. राणा दाम्पत्याविरोधात हे पोस्टर अमरावतीत लावण्यात आले आहेत. छत्तीस दिवस राणा दाम्पत्य अमरावतीत नसल्यामुळे अमरावती जिल्हा विकासपासून दूर राहिला मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जिल्ह्यातून गायब होते. अमरावती जिल्ह्यातील नागरिक हे महागाई, बेजोजगारीने त्रस्त झाले आहेत. आता महागाई, बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी सोडवावा, या आशयाचे पोस्टर शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात लावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com