वक्तव्य भोवले? ब्राह्मण महासंघाने केला अमोल मिटकरींचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महा सभेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.
Amol Mitkari
Amol MitkariDainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महा सभेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलनकर्ते जमले असून अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. त्याचप्रमाणे गुरुजींच्या वेशात आलेले कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचे निदर्शनास येते आहे. (Brahmin Federation protested against Amol Mitkari)

Amol Mitkari
मुंबईकरांनो वाहतूक झाली सोपी; आदित्य ठाकरेंच्या हस्ते 'टॅप-इन टॅप-आउट' सेवेचे उद्घाटन

मिटकरींचा व्हिडिओ झाला व्हायरल, ब्राह्मण समाजातून प्रचंड संताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात आला. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली आहे, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले विकट हास्य आवरले देखील नाहीये. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ब्राह्मण समाजातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यात ब्राह्मण महासभेतर्फे आंदोलन, तर राष्ट्रवादीकडून मिटकरींचं भरभरून समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेले ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महा सभेतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलनकर्ते जमले असून अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. त्याचप्रमाणे गुरुजींच्या वेशात आलेले कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचे निदर्शनास येते आहे.

Amol Mitkari
नक्षली कॉम्रेड नर्मदाचा मुंबईत मृत्यू, गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी दिली ‘दंडकारण्य बंद’ची हाक

मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केलेला नाहीये अमोल मिटकरी

ब्राम्हण संघाकडून मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असं म्हटलंय. यावर अमोल मिटकरी यांनी एबीपी माझासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही, भाषणात मी अपशब्द वापरले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com