बोटीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचे धाडस बघून मुंबई हायकोर्ट निशब्द

विद्यार्थिनी स्वतः छोट्या होडीतून शाळेत जावे लागते, कोयना धरणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बोटीतून या विद्यार्थिनी प्रवास करतात
Children cross koyna dam by boat
Children cross koyna dam by boatDainik Gomantak
Published on
Updated on

इंडिया टुडे समूहच्या 'मुंबई तक'ने केलेला अहवाल बघून मुंबई उच्च न्यायालयाने एका घटनेची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही. अशी व्यथा मुंबई उच्च न्यायालयाने हा अहवाल बघून व्यक्त केली. (Bombay high court Notice cognizance courage of children who cross koyna dam by boat for education)

मुंबई तकने महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यातील एका घटनेचा अहवाल केला होता. या जिल्ह्यातील मुलांना शाळेत जाण्यासाठी बोटीने नदी ओलांडून जावे लागते. या अहवालाची दखल घेत, न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एएस किलोर यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) रजिस्ट्रीला रोस्टर असाइनमेंटनुसार पुढील निर्देशांसाठी हे प्रकरण योग्य खंडपीठासमोर ठेवण्यास सांगितले आहे.

Children cross koyna dam by boat
महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा

मुंबई तक इम्तियाज मुझावार यांनी साताऱ्यावर लक्षवेधी अहवाल दिला. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील खिरवंडी गावात विद्यार्थी स्वतः बोटीने शाळेत जातात असे सांगण्यात आले आहे. शाळकरी मुलांवर तयार केलेला हा अहवाल पाहिल्यानंतर उच्च न्यायालयानेही मुलांच्या धाडसाचे कौतुक केले. विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी बोटीतून प्रवास करावा लागत असल्याचे अहवालात दिसून आले. आणि या मुलांची शाळा सकाळी 9 वाजता सुरू होते.

विद्यार्थिनी स्वतः छोट्या होडीतून शाळेत (School) जात असल्याचे अहवालात दाखवण्यात आले. मुलीचे गाव संरक्षित क्षेत्रात येते. विद्यार्थिनींना प्रथम कोयना धरणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बोटीतून प्रवास करावा लागतो आणि त्यानंतर दुसऱ्या टोकापासून घनदाट जंगलातून सुमारे 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या परिसरात अस्वल, वाघ आदी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे.

Children cross koyna dam by boat
महाराष्ट्रात परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

यावर अहवालामध्ये दिसणारी परिस्थिती पाहता, या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती असलेले धैर्य, इच्छाशक्ती आणि जिद्दीचे न्यायालयाने कौतूक केले आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार काम करू शकते, असे न्यायालय म्हणाले. साताऱ्यातील मुलांच्या धाडसाचे कौतुक करताना न्यायालयाने सांगितले की, 'आम्ही सावित्री च्या मुली आहोत' या कवितेला मुकत आहोत. हे सांगताना न्यायालयाने कवितेतील चार ओळींचाही उल्लेख केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com