स्वच्छता कर्मचारी पन्नासाव्या वर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण

लहानपणी मला अभ्यास करता आला नाही पण आता दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे : रामाप्पा
BMC worker
BMC worker Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, विविध विभागांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. या हजारोंपैकी एक असलेले स्वच्छता कर्मचारी कुंचीकोरवे मशन्ना रामाप्पा यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2022 दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते पास देखील झाले.

BMC worker
PM मोदींच्या महत्वकांक्षी 'अग्निपथ'ला वाढता विरोध; महाराष्ट्रातही पसरणार आंदोलनाचे लोण

रामाप्पाच्या म्हणण्यानुसार, ते नोकरीनंतर दररोज अभ्यास करत असे. त्यांना कुटुंबाने तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले की लहानपणी मला अभ्यास करता आला नाही पण आता दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “मला 57 टक्के मिळाले आहेत. मी दिवसातून 3 तास ​​अभ्यास करायचो. माझी मुलं पदवीधर आहेत त्यामुळे त्यांनीही मला माझ्या अभ्यासात मदत केली. मला माझा अभ्यास सुरू ठेवायचा आहे आणि मला 12वी पूर्ण करायची आहे.”

तीन वर्षांची तयारी
रामाप्पा बीएमसीच्या स्वच्छता विभागाच्या बी वॉर्डमध्ये काम करतात. या परीक्षेच्या तीन वर्षांपूर्वी त्यांनी धारावीच्या युनिव्हर्सल नाईट स्कूलमध्ये इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश घेतला. काम आटोपून ते रोज सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत शाळेत जात असे. ते बीएमसीमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ सफाई कामगार म्हणून काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com