31 मेपर्यंत दुकानांवरील पाट्या मराठी करा, बीएमसीने दिला अल्टीमेटम

बीएमसीचा आदेश काय
BMC order regarding Marathi name plate
BMC order regarding Marathi name plateDanik Gomantak
Published on
Updated on

बीएमसीने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या दुकानांसाठी एक फर्मान जारी केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 31 मे 2022 पर्यंत सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमोर मराठी नावाच्या पाट्या लावाव्यात, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (BMC order regarding Marathi name plate)

बीएमसीचा काय आदेश आहे

आदेशानुसार, नावाची पाटी मराठी लिपीने सुरू करावी आणि त्याचे अक्षर डिस्प्ले बोर्डवर इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान फॉन्टमध्ये नसावे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापनांच्या नवीन नियम 2022 नुसार सर्व दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठीत लिहाव्यात. तसेच नावाच्या फलकावरील मराठी अक्षरे इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांपेक्षा लहान नसावीत.

BMC order regarding Marathi name plate
मेडिकल टेस्टमध्ये मुलगा असल्याचे निष्पन्न, HC च्या निर्णयानंतर सरकारी नोकरी

हे बदल दारू विक्री करणाऱ्या दुकानांना करावे लागणार आहेत

यासाठी सर्व दुकानांना 31 मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोटीसनुसार, दारू विक्री करणाऱ्या दुकानांना कोणत्याही ऐतिहासिक व्यक्ती किंवा किल्ल्यांचे नाव देऊ नये. ऐतिहासिक व्यक्ती आणि किल्ल्यांच्या नावावर असलेल्या दुकानांची नावेही बदलावी लागणार आहेत.

बीएमसी दुकानमालकांची बैठक घेणार आहे

बीएमसीने आपल्या अधिकार्‍यांना नेम प्लेट्सशी संबंधित नवीन नियमांबद्दल लोकांना जागरूक करण्यास सांगितले आहे. बीएमसी दुकानमालक, व्यापारी संघटनेचे सदस्य यांची बैठक घेऊन नवीन नियमांची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करणार आहे. नवीन नियम लागू झाले आहेत की नाही याबाबत बीएमसीचे अधिकारी जूनपासून सर्व दुकानांची तपासणी करणार आहेत. नोटीसनुसार, बीएमसीच्या अखत्यारीत सुमारे 5 लाख दुकाने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com