देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; नंतर सुटकाही

पवारांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा; देवेंद्र फडणवीस
bjp protest march to demand nawab malik resignation devendra fadnavis bjp leaders detained by mumbai police
bjp protest march to demand nawab malik resignation devendra fadnavis bjp leaders detained by mumbai police Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली. त्यांच्यासोबत भाजपचे अन्य नेतेही होते. फडणवीस यांना ताब्यात घेतले त्यावेळी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या गाडीत भाजपचा झेंडा फडकवताना दिसून आले.

bjp protest march to demand nawab malik resignation devendra fadnavis bjp leaders detained by mumbai police
उन्हाळ्यात थंडावा; फक्त 400 रुपयात एसी

का घेतले ताब्यात

नवाब मलिकांवर ईडीची कारवाई (action) झाल्यानंतर ते तुरुंगात आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. बुधवारी त्यांनी आझाद मैदानावरून विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसह मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी भाजपच्या नेत्यांनी मोठी घोषणाबाजीही केली.

bjp protest march to demand nawab malik resignation devendra fadnavis bjp leaders detained by mumbai police
Assembly election result : अनागोंदी गडबड झाल्यास एसपींचे गोळ्या झाडण्याचे आदेश

पवारांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा

आझाद मैदानवर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, हा संघर्ष देशद्रोह्यांच्याविरोधात आहे. पाकिस्तानी लोकांसोबत मिळून काम करत असलेल्या लोकांविरोधात हा संघर्ष आहे. नवाब मलिकांनी (Nawab Malik) बॉम्बस्फोटांच्या आरोपीकडून जमीन विकत घेतली. पण, त्यांचा राजीनामा अजून घेतला नाही. ही घटना राज्यासाठी लाजीरवाणी आहे. सरदार शाहवली खान याने याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचं प्रशिक्षण घेतलं. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणला. तो आजही तुरुंगात आहे.

दाऊदची बहीण हसीना पारकरचा फ्रंट मॅन हा सलीम पटेल या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचलं. एका बाईची जमीन हडपली. त्यांनी ही जमीन सॉलिडस इंफ्रास्ट्रक्चरला विकली. ही कंपनी नवाब मलिकांची आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी (Accused) जे तुरुंगात आहेत त्यांच्याकडून तुम्ही कवडीमोल भावात विकत घेतली. तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com