व्यासपीठावरुन बोलताना एखाद्या जबाबदार व्यक्तीने किती भान संभाळून बोललं पाहिजे याची चर्चा सध्या राज्यभरात करण्यात येत आहे. अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी स्वातंत्र्यादिनाच्या कार्यक्रमाला हा अमृत महोत्सव आहे की, हिरक महोत्सव असं वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मिडियावर प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता असंच धक्कादायक वक्तव्य भाजप आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांनी केलं आहे. त्यांच्या या धक्कादायक वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यामधील (Satara) माण खटावचे आमदार असलेले जयकुमार गोरे यांनी प्रभू रामचंद्राबाबत धक्कादायक विधान केले आहे.
दरम्यान, गोरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील भाजपची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला (Shiv Sena) भाजपवर निशाणा साधण्यासाठी चांगलाच मुद्दा सापडला आहे. सातारामधील वडूजच्या तासेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे यांनी म्हटले की, रामायणात लढाईदरम्यान रामाने रावणाला पराजित केले. त्यावेळी रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले तेव्हा माझ्याकडे एवढी सेना आहे. प्रचंड ताकद आहे. मोठ्या प्रमाणात राक्षसांची फौज आहे. तुझ्याकडे मात्र केवळ वानरे आहेत. तरीही तु जिंकलास कसा? तेव्हा त्यावर राम म्हमाला, माझ्याकडे तुझा सख्खा भाऊ बिभीषण होता. आणि म्हणून मी तुझ्याबरोबर झालेल्या लढाईत विजयी झालो. यानंतर आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर बंधू नसतानाही मी विजयी झालो. कारण रामाची वृत्ती खराब होती. असं विधान गोरे यांनी व्यासपीठावरुन बोलताना दोन वेळा केले.
त्यावर क्रार्यक्रमात जमा झालेल्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर रामाची नाहीतर रावणाची नियत चुकीची होती अशी दुरुस्ती करत आमदार गोरे यांनी आपल्या विधानामध्ये दुरुस्ती केली. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दुसरीकडे आमदार गोरे यांनी केलेल्या विधानाची खिल्ली उडविण्यात येत आहे. शिवसेनेने भगवान रामाची निंदा करणाऱ्या आमदार गोरे यांचा तीव्र निषेध केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.