'महाराष्ट्र अराजकतेकडे चाललाय': आशिष शेलार

एकाद्या संपादकाने सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्याच्या घरात घूसून हल्ला केला जातो.
Ashish Shelar
Ashish ShelarDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र राज्य अराजकतेकडे चाललाय आहे. सोशल मिडियावर एखादी व्यक्त झाली तर त्याच्यावर हल्ला केला जात आहे. एका संपादकाने सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्याच्या घरात घूसून काही सरकार समर्थकांकडून हल्ला केला गेला. राज्यात दहशतवादी कारवायाचं वातावरण असताना एटीअस आणि पोलिस शांत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर टोकाचे गुन्हे दाखल केले जात असताना सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सत्तेत बसणारे लोकही अराजकता निर्माण करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे तक्रारदार आणि सामान्य माणूस असहाय झाले आहेत.

Ashish Shelar
हसन मुश्रीफांना भाजपची ऑफर...

खोट्या आरोपाच्या नावाखाली करुणा शर्मा या महिलेला अटक करण्यात आली आहे. सध्या सोशल मिडियावर एक चित्रफित फिरत असून ती बहुतेक पुण्यातील असेल असा अंदाज लावला जात आहे. या व्हिडिओमध्ये लखोबा लोखंडे हा व्यक्ती असून त्याला शिवसैनिकांकडून मारहाण केली जात आहे. तसेच अनिल देशमुख अद्याप बाहेर कसे काय आहेत असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांनी व्यक्त होण्याची वेळ आली आहे. तसेच राज्यातील बुध्दिवंतानीही आता लक्ष देणे आवश्यक आहे. जे सरकारच्या विरोधात बोलत आहेत त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. एका माजी खासदाराला बोगस नोटीस दाखवली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com