महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात एकूण 45 मंत्री असण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर, त्यापैकी बहुतांश भाजपचे मंत्री असणार आहेत. नवीन मंत्रिमंडळात भाजपचे 25 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 13 मंत्र्यांचा समावेश होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (BJP 25 MLAs and 13 Shiv Sainiks of Shinde group to be ministers agreement on cabinet expansion)
त्याचबरोबर अपक्ष आमदारांनाही मंत्री केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्या या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय बहुतांश नवीन मंत्र्यांचा समावेश होईल. पुढील महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपला नव्या चेहऱ्यांची चाचपणी करायची असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे भाजप आता या नव्या फॉर्म्युल्यावर काम करत आहे. मंत्र्यांच्या नावावर सर्वोच्च नेतृत्वाकडूनच एकमत होत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
शिवसेनेमध्ये (Shivsena) सत्तापालट करून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार देखील पाडले. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस त्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले आहेत.
शिंदे सेना आणि भाजप यांच्यात फॉर्म्युला निश्चित होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला प्रत्येक तीन आमदारांमागे एक आणि भाजपला प्रत्येक चार आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार आहे.
शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या संभाव्य अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा 11 जुलैला निर्णय आल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर छावणीतून 16 जणांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटीसबाबात वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र, हीच खरी सेना असून टीम ठाकरे अल्पमतात असल्याचा शिंदे गटाचा दावा असल्याचे समोर आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.