ख्रिसमसवेळी मुंबईत गर्दी टाळा; बृहन्मुंबई महापालिकेचे आवाहन

बीएमसी (BMC) आयुक्तांनी लोकांना हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा, मॉल्स आणि इतर ठिकाणी सर्व कोविड-19 नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
BMCOmicron-variant

BMC

Omicron-variant

Dainik Gomantak

Published on
Updated on

ओमिक्रॉनच्या प्रसारामुळे मुंबईत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रमुखांनी लोकांना आगामी ख्रिसमस सणावेळेस गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिला आहे.

BMC

Omicron-variant

महाराष्ट्रात महागाईचा उद्रेक, भाज्यांचे दर भिडले गगनाला!

"कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) ओमिक्रॉन (Omicron variant) प्रकारामुळे जगातील अनेक देशांतील परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही मास्क घाला आणि कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. सर्व नागरिकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे," असे नागरी संस्था प्रमुखांनी रविवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बीएमसी (BMC) आयुक्तांनी लोकांना हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा, मॉल्स आणि इतर ठिकाणी सर्व कोविड-19 नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. "कोविड -19 नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर बीएमसीच्या वॉर्ड स्तरावरील टीम तसेच मुंबई पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल," असे बीएमसी प्रमुखांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

BMC

Omicron-variant

महाराष्ट्रात ओमिक्रोनच्या संसर्गात वाढ, आणखी सहा रुग्ण आले समोर

बीएमसीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्य सचिवांनी 27 नोव्हेंबर रोजी एक आदेश जारी केला आणि COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. मुंबई पोलिसांनी 14 डिसेंबर रोजी एक अधिसूचनाही जारी केली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की उल्लंघन करणार्‍यांवर भारतीय दंड संहिता तसेच महामारी रोग कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com