

मुंबईतील (Mumbai) नागपाडा भागात महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाने (ATS) केलेल्या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादीविरोधी पथकाने (Anti Terrorism Squad) केलेल्या या कारवाईत पोलिसांनी या दोघांकडून सात किलो युरेनियम जप्त केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी जप्त केलेल्या या युरेनियमची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 21 कोटी रुपये एवढी असल्याचे समजते आहे. (ATS has arrested two persons from Mumbai with 7 kg of uranium)
नैसर्गिक स्वरूपात स्वरूपातील 7,100 ग्रॅम युरेनियमपोलिसांनी जप्त केले असल्याची समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या युरेनियमची किंमत जवळपास 21 कोटी रुपयांच्या वर असल्याचे समजते आहे. युरेनियम हा किरणोत्सर्ग निर्माण करणारा धातू असून या धातूचा उपयोग अनवस्त्रे बनवण्यासाठी होत असतो.
या कारवाई मध्ये पोलिसांनी पकडलेले हे दोघे युरेनियमसाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी या दोघांना सिनेस्टाईल ट्रॅप लावून अटक केली. दरम्यान, या दोघांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात युरेनियम कुठून आला याचा पोलीस तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.