महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या आर्यन खान प्रकरणामध्ये (Aryan Khan case) अनेक मोठे खुलासे समोर येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. यातच आता आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनवाणी पार पडली. मात्र न्यायालयाकडून आर्यनला दिलासा मिळालेला नाही. आता आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी सुनवाणी होणार आहे. मागील काही दिवसांपासून आर्यन कोठडीमध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन एनसीबी आणि महाराष्ट्र सरकार आमने -सामने आले होते. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय वळण देण्याचा प्रयत्न देखील केला. त्यामुळे आर्यनची सुटका कधी होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागू राहिल होतं.
दरम्यान, हाय-प्रोफाइल आर्यन खान (Aryan Khan) कथित आम्ली पदार्थ प्रकरणात, भारताचे माजी ऍटर्नी जनरल(Former Attorney-General for India), आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जो जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे आणि त्या जमीन अर्जाच्या सुनावणीसाठी मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.आर्यन खानच्या जामीन सुनावणीसाठी (Aryan Khan Bail) मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्यासाठी रोहतगी सोमवारी उशिरा मुंबईत दाखल झाले आहेत.
आर्यन खानच्या जामीन प्रकरणी मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहीन, असे मुकुल रोहतगी यांच्याकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे. (Now Mukul Rohatgi will argue for Aryan Khan in Mumbai High court, Know About him)
तसेच, 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ जहाजावर (Cruise ship) रेव्ह पार्टी दरम्यान केलेल्या छाप्यांच्या चालू तपासाव्यतिरिक्त, एनसीबीने अनन्या पांडेच्या घरीही जाऊन तिला चौकशीसाठी बोलावले आहे. गुरुवारी अनन्या, तिचे वडील आणि अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) यांच्यासह, NCB ने बोलाविल्यानंतर NCB अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. एजन्सीच्या अर्धा डझन अधिकार्यांकडून त्याची 2 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली आणि 22 ऑक्टोबर रोजी त्याची 4 तास चौकशीही करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.