पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; मार्गावरील दारुची दुकाने राहणार बंद

सोहळ्यादरम्यान मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट ही असतील बंद
Vari
Vari Dainik Gomantak

पंढरपुरच्या वारीने महाराष्ट्राला एक वेगळीच ओळख करुन दिली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातून भाविक या सोहळ्यात सहभागी होत असतात. यंदाच्या पालखी सोहळ्याची रुपरेषा नुकतीच स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार 20 रोजी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे. तर 21जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. (Administration ready for Pandharpur Palkhi ceremony )

शिवसेनेला क्रॉस व्होटिंगची धास्ती, आमदारांना हॉटेलमध्ये लपवलंदोन वर्षानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी या सोहळ्यासाठी दाखल होतील, असं असलं तरी यंदा पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Vari
शिवसेनेला क्रॉस व्होटिंगची धास्ती, आमदारांना हॉटेलमध्ये लपवलं

पालखी सोहळ्यादरम्यान असणारी तळाची ठिकाणं सुरु असून यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे उरळी देवाची येथील साईड पट्टयांची कामे, वडकीनाला येथील पालखी विसावा, जेजुरी पालखी तळ, लोणी काळभोर, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील सेवा रस्त्याची दुरुस्ती, दौंड ते नीरा रस्त्याच्या साईड पट्टयांची दुरुस्ती ही कामे सुरु आहेत.

Vari
Monsoon Alert: पांडवकडा धरण पावसाळ्यात पर्यटकांसाठी राहणार बंद

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कऱ्हा नदीवरील पुलाची दुरुस्ती, इंदापूर तालुक्यातील आंथुर्णे आणि सणसर येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण व रस्ता करण्यात येत आहे. सासवड नगरपालिकेतर्फे पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणाशी संबंधित कामे सुरू आहेत.

परिवहन विभागातर्फे पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षाविषयक तपासणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी् मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियोजन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com