Marathi literature Conference : अमेळनेरमधील साहित्य संमेलनामध्ये गोमंतकीय साहित्याची प्रशंसा

Marathi literature Conference :यशिवाय कविकट्टयावरही कविता सादर केल्या. ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल गावस, पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर, विठ्ठल ऊर्फ काका प्रभुदेसाई यांनीही संमेलनात भाग घेतला.
Marathi literature Conference
Marathi literature Conference Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Marathi literature Conference : अमळनेर, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खास निमंत्रित म्हणून सहभागी झालेल्या गोव्यातील साहित्यिकांनी आपल्या कसदार साहित्याने सर्वांची मने जिंकून या संमेलनात गोव्याची स्वतंत्र नाममुद्रा उमटवली.

उपस्थित देशभरातील साहित्यिकांनी गोमंतकीय साहित्यिकांची भरभरून प्रशंसा केली. संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे यांनी गोमंतकीय साहित्यिकांची प्रशंसा केली. लोकसभेच्या माजी सभापती तथा संमेलनाच्या उदघाटक सुमित्राताई महाजन यांनीही गोमंतकीय साहित्यिकांना आशीर्वाद दिले. तसेच गोव्याच्या मंदिर परंपरेबाबत त्यांनी प्रशंसोद्‍गार काढले.

श्रद्धांजली सत्रात देशभरातील दिवंगत मराठी साहित्यिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गोव्यातील ज्येष्ठ रंगकर्मीं, साहित्यिक विजयकुमार नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.हा ठराव रमेश वंसकर यांनी मांडला.

Marathi literature Conference
Goa Congress: रॅलीवर टीका करत काँग्रेसने मोदींकडे केल्या 'या' मागण्या; प्रदेशाध्यक्ष म्हणाले कळसा भांडुरा प्रकल्प...

‘कुळागर’ मधून गोव्यातील प्रादेशिकतेचा ठसा

गोमंतकीय कथाकार गजानन देसाई यांनी कथाकथन सत्रात त्यांच्या ‘कुळागर’ कथेतून गोव्यातील प्रादेशिकतेचा ठसा उमटवला. पौर्णिमा राजेंद्र केरकर यांनी ‘आपलीच ओवी आपणच गावी’ ही महिलांना सावध करणारी कविता सादर करून रसिकांना अंतर्मुख केले.

यशिवाय कविकट्टयावरही कविता सादर केल्या. ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल गावस, पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर, विठ्ठल ऊर्फ काका प्रभुदेसाई यांनीही संमेलनात भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Subhash Velingkar Marathi Language Goa
Goans Surrender Passports Every Day
Goa Name Change Law 1990
Goa University
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com