Mumbai: दारू पाजून, अश्लील व्हिडिओ दाखवून भडकवले, 32 वर्षीय महिलेचा अल्पवयीन मुलावर 3 वर्ष लैंगिक अत्याचार

महिला आरोपीने स्वत:ला विवस्त्र करून मुलाला विवस्त्र करून मोबाईल फोनवर व्हिडिओ बनवला.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 32 वर्षीय महिलेनं सलग तीन वर्ष अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला अल्पवयीन मुलाला दारू पाजून मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून भडकवायची.

मूळ नाशिक येथील असणारी या महिलचे कीर्ती घायवटे असे नाव आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिला अटक देखील केली आहे.

Goa Crime
Pakistan: भारताकडून पाकिस्तानच्या अब्दुल रहमान मक्कीला संयुक्त राष्ट्रांच्या यादीतील दहशतवादी म्हणून घोषित

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा नववीत शिकतो, तो कल्याण पूर्व येथे आपल्या आजीसोबत राहत आहे. आरोपी महिला नाशिकची असून, तिला दोन मुले आहेत.

मुलाची मावशी नाशिकमध्ये राहते, आरोपी महिला आणि मुलाच्या मावशीचे जवळचे संबंध होते. मावशी जेव्हा कल्याणला यायची तेव्हा ती आरोपी महिलेलासोबत घेऊन यायची, त्यामुळे पीडित मुलगा आणि कीर्तीची ओळख झाली.

मुलाला पाहून महिला आकर्षित झालेल्या महिलेने मुलाशी ओळख वाढवली. आणि विविध प्रलोभने दाखवून मुलाला बंद खोलीत बोलावून जबरदस्तीने दारू पाजली. तसेच, मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून मुलाचे मानसिक संतुलन बिघडवले. मुलासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. महिला आरोपीने स्वत:ला विवस्त्र करून मुलाला विवस्त्र करून मोबाईल फोनवर व्हिडिओ बनवला.

Goa Crime
Pathaan Tickets: शाहरूखच्या 'फॅन'साठी खूशखबर, 'पठाण'च्या तिकीट दरात मोठी कपात

दरम्यान, मुलाचा मोबाईल आईने तपासला असता त्यात महिलेसोबत त्याचे अक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. याबाबत आईने मुलाला विचारले असता तिने संपूर्ण घटना सांगितली. या प्रकरणी कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक केली.

तसेच, कुटुंबीयांनी मुलाला भिवंडी शहरातील बालसुधारगृहात दाखल केले आहे. बालसुधार विभागाने मुलाचे समुपदेशन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com