King Cobra In Dodamarg: दोडामार्गात भरवस्तीत आढळला तब्बल 14 फूट लांबीचा 'किंग कोब्रा'; भल्या मोठ्या नागाला पाहून ग्रामस्थांच्या उंचावल्या भुवया

King Cobra Rescued In Dodamarg: तालुक्यातील तळकट भटवाडी परिसरात शुक्रवारी (६ जून) दुपारच्या सुमारास १४ फूट लांबीचा भला मोठा किंग कोब्रा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
King Cobra Rescued In Dodamarg
King Cobra Rescued In DodamargDainik Gomantak
Published on
Updated on

दोडामार्ग: तालुक्यातील तळकट भटवाडी परिसरात शुक्रवारी (६ जून) दुपारच्या सुमारास १४ फूट लांबीचा भला मोठा किंग कोब्रा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भरवस्तीत आढळलेल्या या विषारी सापामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

गावातील रहिवासी अभिजीत देसाई यांना हा किंग कोब्रा त्यांच्या घरासमोरच्या परिसरात दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ गावातील नागरिकांना आणि वनविभागाला याबाबत माहिती दिली. झोळंबे येथील अनुभवी सर्पमित्र विठ्ठल गवस यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं.

King Cobra Rescued In Dodamarg
Rapido In Goa: मोटरसायकल पायलटांवर संक्रांत! गोव्यात होणार ‘रॅपिडो’ची एंट्री; पारंपरिक व्‍यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे

विठ्ठल गवस यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं अतिशय दक्षतेने आणि कुशलतेने या किंग कोब्राचा शोध घेत त्याला सुरक्षितपणे पकडलं. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा थरार पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं, मात्र सर्पमित्रांच्या कौशल्यामुळे कोणतीही दुर्घटना टळली नाहि.

सुमारे १४ फूट लांबीचा किंग कोब्रा नाग हा अत्यंत विषारी जातीचा साप असून तो सहसा मानवी वस्तीत दिसत नाही. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर जंगल भागात होणाऱ्या हालचालीमुळे हे सरपटणारे प्राणी सुरक्षित आसऱ्याच्या शोधात वस्तीच्या दिशेनं येतात. यामुळे स्थानिक प्रशासन आणि वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

King Cobra Rescued In Dodamarg
Goa: 'अवकाळी'चा फटका! गोव्यात 90 हजार हेक्टर लागवडीखालील शेतीचे नुकसान; भातशेती, भाजीपाला नष्ट

या घटनेनंतर गावात सापाविषयी सुरक्षा उपायांबाबत सर्पमित्रांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं. पकडण्यात आलेल्या किंग कोब्राला वनविभागाच्या उपस्थितीत सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com