Goa News: "सुंदर साखळीमुळे मालमत्तांचे मूल्य वाढणार"

Today's Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,क्रीडा,मनोरंजन आणि इतर महत्वाच्या बातम्या
live Goa news
live Goa newsDainik Gomantak

पंचायत संचालनालयाची दोन सरकारी वाहने चोरीला

पणजीतील करंझाळे परिसरातून पंचायत संचालनालयाची दोन चारचाकी वाहने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंचायत संचालक महादेव अरुंदेकर यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

"युनिटी मॉल फेकून द्या!" चिंबलमध्ये महासभेचा एल्गार

चिंबल येथील प्रस्तावित 'युनिटी मॉल' आणि 'प्रशासन स्तंभ' प्रकल्पाविरोधात आज ग्रामस्थांनी भव्य महासभेचे आयोजन केले होते. या सभेत शेकडो स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. "एक दो, एक दो! युनिटी मॉल को फेक दो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

खिंड-मोरजी येथे शापोरा नदीकाठी संरक्षण भिंतीचे काम सुरू

मांद्रे मतदारसंघातील खिंड-मोरजी येथील शापोरा नदीकिनारी नवीन संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाचा आज शानदार शुभारंभ करण्यात आला. आमदार जीत आरोलकर यांनी जलस्रोत विभागांतर्गत (WRD) या महत्त्वाच्या कामाला गती दिली आहे.

थिवी-माडेल येथे बेपत्ता 70 वर्षीय महिलेचा शोध सुरू

थिवी येथील माडेल परिसरात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी नदीकाठी काही तरुणांना या महिलेच्या चपला सापडल्या, त्यानंतर त्यांनी तत्काळ तिच्या कुटुंबाला माहिती दिली.

"जनतेच्या विरोधात जमीन रूपांतरण झाल्यास गप्प बसणार नाही!"

पेडणे तालुक्यातील जमिनींच्या झपाट्याने होत असलेल्या रूपांतरणावरून आमदार जीत आरोलकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "स्थानिक पंचायत आणि नागरिकांना विश्वासात न घेता जर कोणतीही जमीन रूपांतरित झाली, तर आम्ही ते सहन करणार नाही," अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

"सुंदर साखळीमुळे मालमत्तांचे मूल्य वाढणार"

साखळी शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. शहर स्वच्छ राहिल्यास केवळ आरोग्यच सुधारणार नाही, तर साखळीतील सदनिका (Flats) आणि भूखंडांच्या (Plots) किमतीतही मोठी वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com