Goa Live News: आमदार संकल्प आमोणकर यांनी काशिनाथ शेट्ये यांच्या विरोधात दाखल केली एफआयआर

Goa Today's Breaking News 1 March 2025: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa Live News: आमदार संकल्प आमोणकर यांनी काशिनाथ शेट्ये यांच्या विरोधात दाखल केली एफआयआर

Goa Crime: आमदार संकल्प आमोणकर यांनी काशिनाथ शेट्ये यांच्या विरोधात दाखल केली एफआयआर

आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह शेकडो स्थानिकांनी मडगाव पोलीस ठाण्यात काशिनाथ शेट्ये यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली. शेट्ये यांनी अधिकृत कामासाठी 'रेंट अ कार' वाहन वापरल्याचा आरोप आमोणकर यांनी केला आहे आणि सरकारने दिलेल्या वेळेपूर्वी साइटवर काम सुरू केले.

Goa News: हिंदवी नाट्य महोत्सवात पेडणे; "तो मृत्युंजय एक "या नाटकास प्रथम पारितोषिक प्राप्त

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज, पेडणे गोवा यांनी शिवजयंती उत्सव २०२५निमित्त आयोजित हिंदवी नाट्य महोत्सवात पेडणे येथिल श्री भगवती क्रिडा आणि सांस्कृतिक मंडळाने मराठवाडा मांद्रे येथिल श्री देवी सातेरीच्या सभामंडपात सादर केलेल्या "तो मृत्युंजय एक " या नाटकास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

VIjay Sardessai: रात्री उशिरा ज्येष्ठ नागरिकांच्या घराबाहेर दादागिरी करणे चुकीचे आहे : आमदार विजय सरदेसाई

माझ्या मतदारसंघात ही घटना घडली, मी याचा निषेध केला. उदय भेंबरे वस्तुस्थिती सांगतात. राजकीय दबावाचा वापर करून रात्री उशिरा ज्येष्ठ नागरिकांच्या घरी येऊन दादागिरी करणे चुकीचे आहे. मलाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे. गोव्याचे यूपी, बिहार बनू नये. मुख्यमंत्र्यांनी उदय भेंबरे यांच्याशी बोलावे : आमदार विजय सरदेसाई

Valpoi News: श्री ब्राह्मणी महामाया देवीचा वर्धापनदिन; डॉ देविया राणे यांनी घेतला आशीर्वाद

कोपार्डे सत्तरी येथील श्री ब्राह्मणी महामाया देवीचा वर्धापनदिन १ व २ मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. आज सकाळपासून विविध धार्मिक विधी संपन्न झाली. या निमित्त स्थानिक आमदार डॉ देविया राणे यांनी आशीर्वाद घेतला.

Bicholim News: डिचोलीत आढळली ११.५ फूट लांबीची मगर

डिचोलीत आढळली ११.५ फूट लांबीची मगर. प्राणीमित्र अमृतसिंग यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने वाठादेव नदीत पकडली मगर. मगरीला केले वन खात्याच्या स्वाधीन.

Calangute Goa Beach: हरवलेल्या 6 वर्षांच्या लहानगीला पुन्हा भेटली आई; पर्यटक पोलीस युनिटची कौतुकास्पद कामगिरी

पर्यटक पोलीस युनिट कळंगुट किनाऱ्यावर गस्त घालत असताना त्यांना समुद्रकिनाऱ्यावर सुमारे 6 वर्षे वयाची एक तरुण मुलगी रडताना दिसली. चौकशी केल्यावर तिने तिची माहिती दिली. पुढे पर्यटक पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अल्पवयीन मुलीच्या पालकांचा शोध घेतला. योग्य तपासणीनंतर अल्पवयीन मुलीला तिच्या आईजवळ देण्यात आलं.

Kashinath Shetye Goa: इलेकट्रोनिक ऑफिसर काशिनाथने केला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

काशिनाथ शेट्ये यांनी त्यांना धमकावल्याबद्दल वाहन नोंदणी क्रमांकासह बोगदा, वास्को येथील ४ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यांनी एफआयआर कॉपीमध्ये आमदार संकल्प आमोणकर यांचाही उल्लेख केला आहे.

Goa News: मी आणि मुख्यमंत्री एकाच पेजवर आहोत; लोकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल: विश्वजित राणे, आरोग्यमंत्री

मी आणि मुख्यमंत्री एकाच पेजवर आहोत. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. मला नर्सिंग कॉलेज हवे आहे आणि गोव्यासाठी अधिक जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत. सर्व लोकांना विश्वासात घेऊन हिताचा निर्णय घेतला जाईल : विश्वजित राणे, आरोग्यमंत्री

Goa Transport: नवीन अर्ज रेंट-ए-कॅब परवाने परिवहन संचालनालयाकडून स्वीकारले जाणार नाहीत

रस्त्यांवरील अपघातांच्या वाढत्या संख्येच्या दृष्टीकोनातून, खासगी रेंट अ कॅब गाड्या पर्यटकांकडून घाईगडबडीने आणि निष्काळजीपणे चालविल्याने गंभीर दुखापत आणि मृत्यू होतात आणि म्हणून आता रेंट-अ-कॅब परवाने/परवानग्यांचे नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परिवहन संचालनालयाने नोटीस जारी केली आहे.

Goa Police: पोलिसांनी प्रत्येक क्षेत्राचा अनुभव घेतला पाहिजे: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

वाहतूक, किनारी आणि सुरक्षा यासह सर्वच क्षेत्रात पोलिसांना रॅशनल ट्रेनिंग घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत मी डीजीपींशी चर्चा केली. दरवर्षी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक क्षेत्राचा अनुभव घेतला पाहिजे. : मुख्यमंत्री सावंत

Pramod Sawant: पोलिस सेवा करताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवला जाणार नाही: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

वाळपई पोलिस प्रक्षीशन केंद्रात आयोजित दीक्षांत सोहळ्यात उपस्थितांना सीटकावणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com