Goa Live News: २०२७ मध्ये २७ जागांसाठी श्री रूद्रेश्वरचरणी प्रार्थना

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी
 Goa news in Marathi
Goa news in MarathiDainik Gomantak

२०२७ मध्ये २७ जागांसाठी श्री रूद्रेश्वरचरणी प्रार्थना

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सकाळी हरवळेत श्री रूद्रेश्वरचरणी अभिषेक केला. २०२७ मध्ये भाजपला २७ जागांसाठी प्रार्थना केली - दामू नाईक. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्या शुभेच्छा २७ जागांचे दामू नाईक यांचे स्वप्न प्रत्यक्षात यावे - मुख्यमंत्री.

अर्धवट स्थितीत असलेला ब्रिज काम पूर्ण करण्यासाठी अनमोड मार्ग करण्यात येणार अडीच महिन्यासाठी बंद

बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूर ते अनमोड दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहनधारकांना पुन्हा एकदा मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या मार्गावर अर्धवट स्थितीत असलेल्या 'हत्ती ब्रिज'चे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी हा मार्ग पुढील अडीच महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे गोवा-कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

देवसडा- धारबांदोडा येथील अपघात प्रकरणी फोंडा पोलिसांनी मालवाहू ट्रक चालकाविरुद्ध केला गुन्हा नोंद. अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पर्यावरण सेलचे संयोजक विकास भगत यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युवा उपाध्यक्ष रुणाल केरकर यांच्यावरील हत्येच्या प्रयत्नाचा निषेध केला आहे. अशा घटनांवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याचे सिद्ध होते. गोवा सरकार गाढ झोपेत आहे तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात व्यस्त आहेत, असे भगत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com