Goa Live News: हडफडे आग दुर्घटनेतील पीडितांची मंत्र्यांनी घेतली भेट; रोहन खंवटे यांची कठोर कारवाईची मागणी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा हडफडे नाईटक्लब प्रकरण आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa live news in Marathi
Goa live news in MarathiDainik Gomantak

हडफडे आग दुर्घटनेतील पीडितांची मंत्र्यांनी घेतली भेट; रोहन खंवटे यांची कठोर कारवाईची मागणी

मंत्री रोहन खंवटे यांनी हडफडे येथील क्लब आग दुर्घटनेतील पीडितांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेची योग्य चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदारी न घेणाऱ्या आस्थापनांविरुद्ध त्वरित एफआयआर (FIR) दाखल केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. गोव्यासाठी पर्यटन महत्त्वाचे असल्याने, अशा सर्व ठिकाणांनी अग्नी आणि सुरक्षा नियमांचे कठोर पालन करणे बंधनकारक आहे, असेही मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.

हडफडे दुर्घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल; 25 मृतांच्या घटनेचा तपास सुरू, अधिक तपशीलाची प्रतीक्षा

'30 सेकंदात छत कोसळले, बाहेर पडायला मार्ग नव्हता'; हडफडे दुर्घटनेतील जखमीचा थरार

हडफडे दुर्घटनेतील जखमीचा आम आदमी पक्षाच्या (AAP) गोवा युनिटने बांबोळीतील गोमेकॉ (GMC) येथे आरपोरा आग दुर्घटनेतील जखमी पीडिताची भेट घेतली. पीडिताने दुर्घटनेचा थरार सांगताना म्हटले की, "नृत्य सादरीकरणादरम्यान फ्लेअर गनचा वापर करण्यात आला, ज्यामुळे छताने पेट घेतला. अवघ्या ३० सेकंदांच्या आत छत कोसळायला लागले. बाहेर पडण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे अनेक लोक अडकले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला." 'आप' गोवा पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी सरकारला या घटनेची सखोल चौकशीकरण्याची मागणी केली आहे.रार

हडफडे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीची उपाययोजना; उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून नियंत्रण कक्ष स्थापन

बार्देस तालुक्यातील हडफडे येथे झालेल्या मोठ्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रभावी निरीक्षण , घडामोडींवर तातडीने प्रतिसाद आणि लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

हडफडे दुर्घटनेवर बोलताना आमदार मायकल लोबो भावूक; डोळ्यात आले अश्रू

आमदार मायकल लोबो हे आज हडफडे येथील भीषण दुर्घटनेबद्दल बोलताना अत्यंत भावूक झाले. मृतांबद्दल बोलत असताना त्यांना आपला गळा दाटून आला आणि ते रडू लागले . या दुःखद घटनेवर बोलताना लोबो यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

गोव्याच्या पर्यटन इतिहासातील 'काळा दिवस'; 'निष्पाप जीवांच्या मृत्यूला भाजप सरकार जबाबदार'

काल रात्री हडफडे येथील एका क्लबमध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या धक्कादायक मृत्यूमुळे, गोव्याच्या पर्यटन इतिहासातील हा एक सर्वात काळा दिवस ठरला आहे. ही भयानक घटना केवळ एक अपघात नसून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या प्रशासन, नियामक देखरेख आणि सार्वजनिक सुरक्षितता यांमध्ये झालेल्या संपूर्ण विघटनाचा थेट परिणाम आहे, अशी संतप्त टीका करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com