Goa Live News: सार्वजनिक विद्यापीठ विधेयकाचा गोवा विद्यापीठावर परिणाम : विजय

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी.
goa breaking news
goa breaking newsDainik Gomantak

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

सिंधी समाज मडगावने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना त्यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

गोशाळेत गोधन अर्थातच गुरांचा पाडवा उत्साहात

सिकेरी-मये येथील गोशाळेत गोधन अर्थातच गुरांचा पाडवा उत्साहात. गोवंशांची पूजा करून गुरांना खाऊ घातले पोळे. गोशाळेत तब्बल सहा हजार गुरे

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर

गोपूजनातून सकारात्मकता प्राप्त होते. गोव्यात गोपालन व गोरक्षणासाठी गोशाळांबरोबरच समाजसेवक, समाजसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून रस्त्यांवरील गुरांची संख्या कमी होणार. या कामात गोशाळांना सर्वती मदत करण्यासाठी सरकार तत्पर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. कुडणे साखळीतील गोमांचल गोशाळेत पाडव्यानिमित्त केले गोपूजन.

मंत्री रोहन खवंटे आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी सहा-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची केली प्रत्यक्ष पाहणी

मंत्री आणि पर्वरीचे आमदार रोहन खवंटे, उपसभापती आणि म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी पर्वरी येथे महामार्गावरील महिंद्रा शोरूमसमोर ओडीपी रोडच्या सुरुवातीच्या ठिकाणी सहा-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.

विरनोडा पेडणे येथे गोमाता पूजन उत्सव साजरा

विरनोडा पेडणे येथे गोमाता पूजन उत्सव साजरा करण्यात आला. भाजपा अध्यक्ष दामू नाईक माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर माजी आमदार दयानंद सोपटे,राजन कोरगावकर,विठू मोरजकर ,जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर आधी उपस्थित होते

पळसकट्टा मोले येथे तीन गाड्यामध्ये अपघात

पळसकट्टा मोले येथे तीन गाड्यामध्ये अपघात. गाड्यांचे नुकसान.कुळे पोलिस घटना स्थळी; पंचनामा चालू

बेकायदेशीर जलक्रीडा उपक्रमांना आळा घालण्यासाठी पर्यटन विभागाचे किनारपट्टीच्या आमदारांशी सहकार्य

गोवा पर्यटन विभागाने स्थानिक पंचायती आणि किनारपट्टीच्या आमदारांच्या सहकार्याने, जलक्रीडा उद्योगातील बेकायदेशीर तिकीट विक्री आणि दलालीला आळा घालण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू केले आहेत. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, विभाग एकसमान दर बोर्ड लावण्याची आणि मान्यताप्राप्त जलक्रीडा संघटनांद्वारे व्यवस्थापित केलेले समर्पित किओस्क स्थापित करण्याची योजना आखत आहे.

फोंडा पोटनिवडणुकीत एमजीपी भाजपला पाठिंबा देणार : मंत्री ढवळीकर

फोंडा पोटनिवडणुकीत आम्ही भाजपला पूर्ण पाठिंबा देतो आणि पक्ष जो काही निर्णय घेईल त्याच्या पाठीशी राहू : मंत्री सुदिन ढवळीकर

सार्वजनिक विद्यापीठ विधेयकाचा गोवा विद्यापीठावर परिणाम : विजय

सार्वजनिक विद्यापीठ विधेयकाचा गोवा विद्यापीठावर वाईट परिणाम होईल आणि गोव्याच्या शैक्षणिक रचनेवर त्याचे परिणाम होतील. कोणतीही पावले उचलण्यापूर्वी शिक्षणाशी संबंधित असलेल्यांना विश्वासात घेण्याची विनंती आम्ही बैठकीत केली आहे: आमदार विजय सरदेसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com