Goa Live News: रस्त्याच्या खराब स्थितीमुळे महाखाझान कोलवाळ येथे अपघात

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक आणि ताज्या घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घटना
Goa live news
Goa live newsDainik Gomantak

रस्त्याच्या खराब स्थितीमुळे महाखाझान कोलवाळ येथे अपघात

महाखाझान कोलवाळ येथे अपघात झाला, रस्त्याच्या खराब स्थितीमुळे हिरो स्प्लेंडर बाईक घसरून खाली पडली. त्यांना वाचवण्यासाठी मागून येणाऱ्या गाड्या अचानक थांबल्या त्यामुळे इतर गाड्या एकमेकांच्या मागे धडकल्या. चार गाड्या खराब झाल्या आहेत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोलवाळ पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पंचनामा सुरू आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

गोवा दूध संघ कर्मचारी संघटना गोमंतक मजदूर संघाने फोंडा येथे काढली शांततापूर्ण रॅली

गोवा दूध संघ कर्मचारी संघटना गोमंतक मजदूर संघाने फोंडा येथे शांततापूर्ण रॅली काढली. गोवा डेअरी बस कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणे आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणे हा या रॅलीचा उद्देश होता

भारताने जिंकला आशिया कप, पाकिस्तानी मंत्र्यांकडून नाकारली ट्रॉफी

रविवारी मध्यरात्री, भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला, ज्यामुळे स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध त्यांचा सलग तिसरा विजय झाला. टीम इंडियाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्यांकडून स्पर्धेचा ट्रॉफी आणि विजेत्याचे पदके स्वीकारण्यास नकार दिला. पहिला सामना जिंकल्यानंतर भारताने पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर हा दुसरा वाद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com