Goa News Updates: कॅश फॉर जॉब प्रकरणी सागर नाईकला एक दिवसाची पोलिस कोठडी; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Updates: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी
Goa News Updates: कॅश फॉर जॉब प्रकरणी सागर नाईकला एक दिवसाची पोलिस कोठडी; वाचा दिवसभरातील घडामोडी
Published on
Updated on

कॅश फॉर जॉब प्रकरणी सागर नाईकला एक दिवसाची पोलिस कोठडी!

कॅश फॉर जॉब प्रकरणी सागर नाईक याच्याविरोधात फोंडा पोलिस ठाण्यात आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. सावर्डे येथील सदानंद विठु विर्नोडकर यांना नोकरीचे आमिष दाखवून त्याने 10 लाखांचा गंडा घातला. फोंडा पोलिसांनी सागर नाईकला ताब्यात घेवून रिमांडसाठी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आता सागरला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

धारबांदोडा येथे मालवाहू ट्रकची स्कूटरला धडक, तिघे जखमी!

धारबांदोडा येथे जंक्शनवर मालवाहू ट्रकची स्कूटरला धडक बसून सपना गावकर (17, दावकोण) जखमी. जखमीला गॉमेकोत उपचारासाठी दाखल. स्कूटरवरील अन्य दोघे किरकोळ जखमी.

केळशी समुद्रात येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत वाहतूकीवर बंदी

भारतीय आणि विदेशी नौदलाचे खास शिबीर होणार असल्याने येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत केळशी समुद्रात 2 किमी अंतरापर्यंतच्या सर्व प्रकारची जहाजे तसेच बोटींच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. बंदर कप्तान खात्याकडून आदेश जारी करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करावा, कॅश फॉर जॉब प्रकरणी आमदार व्हेंझी यांचं आवाहान

सरकारी नोकरीसाठी इतका पैसा गोवावासीयांना परवडत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बाहेर पडून या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केले आहे.

भंडारी समाजाची नवनिर्वाचित समिती बेकायदेशीर!

उच्च न्यायालयाने देवानंद नाईक यांची याचिका नियमित खंडपीठाकडे दाखल केली. 7 नोव्हेंबर रोजी जिल्हा निबंधक शेड्यूलसमोर यथास्थितीबाबत पुढील सुनावणी होणार. भंडारी समाजाची नवनिर्वाचित समिती बेकायदेशीर असल्याचे ॲड. अनिश बकाल यांनी सांगितले.

एफसी गोवा देणार पंजाब एफसीला कडवं आव्हान; मानोलो मार्केझ यांनी इरादे केले स्पष्ट

एफसी गोव्याच्या शेवटच्या सामन्यातील विजयानंतर, प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले की, 'संघ पंजाब एफसीला कडवे आव्हान देईल.' एफसी गोवा आणि पंजाब एफसी यांच्यातील हा सामना 6 नोव्हेंबर रोजी फातोर्डा स्टेडियमवर होणार आहे.

बेकायदेशीर घरांचे वीज व पाणी 'कनेक्शन कट'!

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोग्य कायद्या अंतर्गत बेकायदेशीर घरांना देण्यात येणारे वीज व पाणी कनेक्शन आता बंद होणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

कचरा व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री आक्रमक; सरपंच, सचिवांची घेतली शाळा

सरकार दरवर्षी कचऱ्यावर 300 कोटी रुपये खर्च करते. कचरा व्यवस्थापनाबाबत सरपंचांना इच्छाशक्ती आणि सचिवांना अक्कल हवी. यापुढे रस्त्यावर, खुल्या जागेत, ओहोळात कचरा दिसू नये. पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे पडून असून ते वापरा. या पैशांबाबत पंचायत सरपंचांना माहितीच नाही. डिचोली तालुक्यातील पंचायतींची मुख्यमंत्र्यांनी वाचली कुंडली.

मेणकुऱ्यात तलाठ्यावर जीवघेणा हल्ला

मेणकुऱ्याचे तलाठी फटगो पालकर (वय. ४७) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी संजय नाईक आणि अशोक नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पालकर मेणकुऱ्यात जागची तपासणी करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com