
उद्या राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता
गोवा: राज्यात 13 ते15 जुलै रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या म्हणजेच 14 जुलै रोजी अति मुसळधार पावसाची शक्यता गोवा हावामान खात्याने वर्तवली आहे.
ऑपरेशन लोटस अयशस्वी?
भाजपचा काँग्रेस पक्षातील गटबाजीशी काहीही संबंध नाही. आम्ही काँग्रेस पक्षाला उडवायचे ठरवले असते तर आम्ही थेट उडवले असते. असे अयशस्वी ऑपरेशन केले गेले नसते. असे विधान सदानंद तनवडे यांनी केले.
आरजीने उपस्थित केला दुहेरी मतदान कार्डाचा मुद्दा
सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर दुहेरी मतदान कार्डाचा मुद्दा उपस्थित केला मतदान कार्ड नोंदणी निवडणूक आयोगाच्या हाती आहे. दरम्यान, या बाबीकडे लक्ष देण्याची सरकारला विनंती त्यांनी केली.
TCP कायद्याच्या 17B च्या तरतुदींचा वापर करून उल्लंघनांवर कठोर करणार
TCP मंत्री विश्वजित राणे यांनी बेकायदेशीररित्या टेकडी कापणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. TCP कायद्याच्या 17B च्या तरतुदींचा वापर करून उल्लंघनांवर कठोर कारवाई करेल आशी माहिती त्यांनी दिली.
माझ्या परिश्रमाची या पक्षात काहीच किंमत नाही; दिगंबर कामत
2017 मध्ये काँग्रेसला स्पष्ट जनादेश असतानाही, पक्षाने मला सरकार स्थापनेसाठी निवडले नाही. आणि आम्ही संधी गमावली. 2022 मध्ये निवडणुकीसाठी पक्षाचे नेतृत्व करणारा मी एकमेव आमदार होतो. आणि हाच त्यांना पुरस्कार आहे. माझ्याबाबतीत अपात्रता याचिका दाखल करून देत आहे. इतक्या वर्षापासून पक्षासाठी केलेल्या माझ्या परिश्रमाची या पक्षात काहीच किंमत नाही असे मला वाटते.
दिगंबर कामत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.