MS Dhoni: धोनीच्या मानहानी दावा प्रकरणाला नवे वळण, झी मीडियाची मद्रास हायकोर्टात धाव...

धोनीच्या मानहानीच्या दाव्यात चौकशीला परवानगी देणाऱ्या आदेशाला झी मीडियाने मद्रास हायकोर्टात आव्हान दिले आहे.
MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak

MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि झी मीडिया व आपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात केलेल्या मानहानी दावा प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मानहानीच्या दाव्यात चौकशीला परवानगी देणाऱ्या एकल न्यायाधीशाच्या आदेशाला झी मीडियाने मद्रास हायकोर्टात आव्हान दिले आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती आर महादेवन आणि न्यायमूर्ती मोहम्मद शफीक यांनी या प्रकरणाची सुनावणी 13 मार्चपर्यंत तहकूब केली असून आणि या प्रकरणात कोणतेही अंतरिम आदेश देण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे.

MS Dhoni
MS Dhoni: धोनी...धोनी...! 'लोकल बॉय'ची झलक पाहून चाहते दंग; कॅप्टनकूलकडूनही मिळाला प्रतिसाद; Video

साल 2013 मध्ये इंडियन प्रीमीयर लीगमधील सट्टेबाजी प्रकरण समोर आले होते. याच प्रकरणात धोनीच्या विरुद्ध बदनामीकारक कमेंट्स केल्याबद्दल झी मीडिया कंपनी आणि आयपीएस संपत कुमार यांच्यासह इतरांविरुद्ध मानहानीचा आरोप धोनीकडून करण्यात आला होता. धोनीने काही महिन्यांपूर्वीच न्यायपालिकेविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल संपत कुमार यांच्यावर फौजदारी कारवाईही करण्याची याचिकाही दाखल केली होती.

धोनीने केलेल्या आरोपांनंतर संपत कुमार यांना कोणत्याही क्रिकेटपटूविरुद्ध अवमानजनक टिप्पणी करण्यास रोखण्यात आले होते. यानंतरही संपत कुमार यांनी कोर्टमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, ज्यात न्यायालयीन व्यवस्थेविरुद्ध आणि राज्याचे प्रतिनिधित्व करणारे एक नामवंत वकील यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती.

MS Dhoni
MS Dhoni: वेलकम थाला! फुलांची उधळण अन् ढोल-ताशांच्या गजरात 'कॅप्टनकूल' चेन्नईत दाखल; Video Viral

दरम्यान, धोनीने 17 प्रश्नांचा एक संच चौकशी म्हणून दाखल केला होता. कारण दुसऱ्या पक्षाने दाखल करण्यात आलेली लेखी विधाने खूपच सामान्य होती आणि त्यात विशिष्ट प्रतिसाद नव्हता. एकल न्यायाधीशांनी तशी परवानगी दिली होती.

पण झीने हा आदेश बाजूला ठेवण्यासाठी अर्ज दाखल केला होता, जो फेटाळण्यात आला. एकल न्यायाधीशाने झीचा अर्ज फेटाळताना सांगितले होती की मीडिया कंपनी आदेश बाजूला ठेवण्याची कारणे स्पष्ट करू शकली नाही आणि एक एकल न्यायाधीश दुसर्‍या न्यायाधीशाचा आदेश बाजूला ठेवू शकत नाही.

झी मीडियाने आता या आदेशाला विभागीय खंडपीठासमोर आव्हान दिले आहे आणि असा दावा केला आहे की, चौकशीला परवानगी देणारा आदेश पूर्वग्रहदूषित आहे. झीने असा दावा केला आहे की एकल न्यायाधीशांनी अवास्तवता, चिडचिडेपणा, प्रगल्भता, दडपशाही इत्यादींचा समतोल न बाळगता आदेश दिला आहे. याचा फायदा धोनीलाच होईल.

तसेच झीने असाही आरोप केला आहे की आरोपींची उलट तपासणी फिर्यादीच्या आधी झाली, जे न्यायव्यवस्थेला धरून नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com