Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Yuzvendra Chahal Statement On World Cup 2023: 2012च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेला आणि टी-20 व एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने अप्रतिम कामगिरी करणारा चहल 2023च्या विश्वचषकापूर्वी अचानक टीम इंडियातून बाहेर पडला.
Yuzvendra Chahal Statement On World Cup Reason
Yuzvendra Chahal & Rohit SharmaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Yuzvendra Chahal Statement On World Cup 2023: टीम इंडियाचा स्टार अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या संघाबाहेर असला तरी तो नेहमीच आपल्या गोलंदाजीमुळे चर्चांमध्ये असतो. 2012च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेला आणि टी-20 व एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने अप्रतिम कामगिरी करणारा चहल 2023च्या विश्वचषकापूर्वी अचानक टीम इंडियातून बाहेर पडला.

एवढेच नव्हे तर 2024च्या टी-20 विश्वचषकातही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. या सर्व घडामोडींमागे नेमके काय कारण होते, याचा खुलासा खुद्द आता चहलने एका पॉडकास्टमध्ये केला. टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार रोहित शर्माने याविषयी आधीच स्पष्ट कल्पना दिल्याचे आवर्जुन चहलने सांगितले.

Yuzvendra Chahal Statement On World Cup Reason
Rohit Sharma Fan: रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकणार तेव्हाच दाढी करणार अन् केस कापणार! हिटमॅनच्या चाहत्याचा हटके संकल्प चर्चेत

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रासोबतच्या मुलाखतीत बोलताना चहलने 2023चा एकदिवसीय विश्वचषक न खेळण्यामागील कारणावर प्रकाश टाकला. त्याने सांगितले की, संघ व्यवस्थापनाला फलंदाजीमध्ये डेप्थ हवी होती. एवढचं नाहीतर त्यांना नंबर आठपर्यंत एक फलंदाज हवा होता. 2023मध्ये जेव्हा तो काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेला, तेव्हा रोहित शर्माने स्वतः त्याला या निर्णयाबद्दल सांगितले होते. संघ एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याच्या रणनीतीवर काम करत असल्याचे रोहितने कळवले होते. आपल्याला आधीच सर्व गोष्टींची स्पष्ट कल्पना दिल्याचे सांगत चहल म्हणाला की, त्या विश्वचषकानंतर मी आपल्या निवडीबद्दल विचार करणे बंद केले होते.

Yuzvendra Chahal Statement On World Cup Reason
Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

यासोबतच 2024च्या टी-20 विश्वचषकाबाबत बोलताना चहलने धक्कादायक खुलासा केला. रोहित शर्मामुळेच आपली 2024च्या टी-20 विश्वचषक संघात निवड झाली होती, असे त्याने स्पष्ट केले. आयपीएल 2024चा हंगाम अतिशय चांगला गेल्याचे सांगत त्याने सांगितले की, रोहित शर्माने त्याला संघात परत आणणार असल्याचे सांगितले होते आणि निवड समितीच्या बैठकीत यावर चर्चाही केली होती. जरी संघात स्थान मिळाले तरी परिस्थितीनुसार कॉम्बिनेशन जुळल्यासच प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, याची कल्पनाही रोहितने आधीच दिली होती.

Yuzvendra Chahal Statement On World Cup Reason
Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

2021मध्ये संघात निवड न झाल्याने वाईट वाटल्याचे सांगत, 2024मध्ये किमान संघात असल्याचा आनंद असल्याचे त्याने नमूद केले. संघात स्थान मिळूनही एकही सामना न खेळण्याची खंत मनात असली, तरी कर्णधाराने घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे मनातील संभ्रम दूर झाल्याचे त्याने या मुलाखतीत स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com