Year Ending: नीरज चोप्रा ते लक्ष्य सेन, या खेळाडूंनी गाजवले 2022 वर्ष

साल 2022 वर्षात शानदार कामगिरी करणारे भारतीय खेळाडू
Indian Sports Persons| Neeraj Chopra | Bajrang Punia | Lakshya Sen
Indian Sports Persons| Neeraj Chopra | Bajrang Punia | Lakshya SenDainik Gomantak
Published on
Updated on

साल 2022 मध्ये अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. राष्ट्रकुल ते फिफा वर्ल्डकपपर्यंत अनेक क्रीडा स्पर्धांमधून अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आपले आणि आपल्या देशाचे नाव उज्जव केले. या वर्षभरात भारतीय खेळाडूंनीही विविध खेळात आपला करिश्मा दाखवला. अशाच भारतीय खेळाडूंवर नजर टाकूया.

Indian Sports Persons| Neeraj Chopra | Bajrang Punia | Lakshya Sen
Neeraj Chopra | डायमंड लीग फायनल जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय | Gomantak Tv
Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak

निरज चोप्राचा यशस्वी प्रवास कायम

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्राने 2022 वर्षातही भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. त्याने यावर्षी ऑरेगॉन शहरात झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली.

तो अंजू बॉबीनंतर वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा केवळ दुसराच भारतीय बनला. अंडू बॉबीने 2003 साली लांब उडीत कांस्य पदक जिंकले होते. या स्पर्धेत नीरजने 88.13 मीटर लांब भाला फेकला होता.

या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या अँडरसन पीटर्सने 90.54 मीटर लांब भाला फेकलेला. यानंतर त्याने डायमंड लीगमध्येही सुवर्णपदकाची कमाई केलेली. डायमंड लीग फायनलमध्ये त्याने 88.44 मीटर लांब भाला फेक केलेला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय देखील ठरला.

Lakshya Sen
Lakshya SenDainik Gomantak

भारतीय बॅडमिंटनपटूंचीही शानदार कामगिरी

भारतीय बॅडमिंटनपटूंनीही यावर्षात दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. भारतीय बॅडमिंटन संघाने यावर्षी पहिल्यांदाच थॉमस कप जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी इंडोनेशियाला अंतिम सामन्यात 3-0 असे पराभूत केले. भारतासाठी या स्पर्धेत लक्ष्य सेन,एचएस प्रणॉय, किदांबी श्रीकांत, सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दमदार खेळ केला.

तसेच युवा लक्ष्य सेननेही यावर्षात चांगला खेळ करताना राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने याचवर्षात टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि अव्वल क्रमांकावरील विक्टोर एक्सेल्सेनला पराभूत करत जर्मन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही प्रवेश केलेला.

त्याचबरोबर लक्ष्य ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणारा प्रकाश पदुकोण आणि गोपिचंद यांच्यानंतरचा तिसराच भारतीय ठरला.

लक्ष्यव्यतिरिक्त एचएस प्रणॉयनेही यंदा चांगला खेळ केला. तो यावर्षी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळणाराही एकमेव भारतीय खेळाडू होता. तसेच सात्विक आणि चिराग यांच्या जोडीनेही यावर्षी कमाल केली. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याबरोबरच त्यांनी भारताला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकून दिले. हे या स्पर्धेतील भारताचे पुरुष दुहेरीतील पहिलेच पदक ठरले. त्याचबरोबर फ्रेंच ओपन जिंकणारीही त्यांची पहिलीच भारतीय जोडी ठरली.

Indian Sports Persons| Neeraj Chopra | Bajrang Punia | Lakshya Sen
HS Prannoy: वर्षाच्या अखेरीसही एचएस प्रणॉयसाठी आनंदाची बातमी! रँकिंगमध्ये घेतली गरुडझेप

राष्ट्रकुल स्पर्धेतही ऐतिहासिक कामगिरी

भारताने यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह एकूण 61 पदकांची कमाई केली. या स्पर्धादरम्यान 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे, लांब उडीत मुरली श्रीशंकर, तिहेरी उडीमध्ये एल्डॉस पॉल, उंच उडीत तेजस्विनी शंकर यांनी पदकं जिंकत नवे विक्रमही केले.

याच स्पर्धेत टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने कमालीचा खेळ करत सर्वांना चकीत केले. 40 वर्षीय अचंता शरथ कमलने एकेरी, दुहेरी आणि मिश्र अशा तिन्ही प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

Indian Sports Persons| Neeraj Chopra | Bajrang Punia | Lakshya Sen
Olympic आयोजनाचा भारत प्रबळ दावेदार, मोदींचे गृहराज्य करणार होस्ट; क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती
Bajrang Punia
Bajrang PuniaDainik Gomantak

बजरंग पुनियाची पदकांची कमाई

यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. पुरुष गटातील भारताचे या स्पर्धेतील एक एकमेव पदक ठरले, तर एकूण दुसरे पदक ठरले. महिलांच्या गटात विनेश फोगाटनेही कांस्यपदक जिंकले होते. बजरंगने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

हॉकी संघाकडूनही शानदार कामगिरी

हॉकी संघही सध्या चांगला खेळ करताना दिसत आहे. गेल्यावर्षी ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर यावर्षी पुरुष हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. त्यांना अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला होता. आता हॉकी संघ पुढीलवर्षी जानेवारीमध्ये भारतात होणाऱ्या हॉकी वर्ल्डकपसाठी तयारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com