Yashasvi Jaiswal: 'तुला हवं तसं खेळ...', रोहित-विराटबद्दल काय म्हणाला जयस्वाल, पाहा Video

India vs Afghanistan: विराट कोहलीबरोबर फलंदाजी करण्याबद्दल आणि रोहित शर्माच्या पाठिंब्याबद्दल यशस्वी जयस्वालने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Yashasvi Jaiswal - Virat Kohli
Yashasvi Jaiswal - Virat KohliX/BCCI
Published on
Updated on

Yashasvi Jaiswal opened up on Batting with Virat Kohli and Support from Rohit Sharma:

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (14 जानेवारी) अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारताच्या या विजयात यशस्वी जयस्वालने मोलाचा वाटा उचलला. अफगाणिस्तानने भारतासमोर या सामन्यात 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना जयस्वालने 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले.

ही खेळी करताना त्याने दुसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीबरोबर 57 धावांची भागीदारी केली, तर शिवम दुबेबरोबर 92 धावांची भागीदारी केली. तसेच त्याने अफगाणिस्तानच्या डावात अखेरच्या चेंडूवर पळत येत फझलहक फारुकीला धावबादही केले होते.

त्याच्या या शानदार कामगिरीबद्दल आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल त्याने बीसीसीआयशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत.

Yashasvi Jaiswal - Virat Kohli
IND vs AFG: इंदूरच्या स्टेडियममध्ये चाहत्यांचा स्टंट, सुरक्षा तोडून विराटला मारली मिठी; पोलिसांनी घेतलं ताब्यात

जयस्वालने सांगितले की 'मी फलंदाजीची मजा घेतली. खेळपट्टीही चांगली होती. आमच्यासमोर एक चांगले लक्ष्य होते, त्यामुळे माझे लक्ष संघाला चांगली सुरुवात मिळवून देण्यावर होते आणि त्यानंतर धावा करण्यावर होते.'

तसेच त्याने रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर विराटबरोबर झालेल्या अर्धशतकी भागीदारीबद्दल सांगितले की 'तिथे खेळणे मस्त होते. जेव्हाही मी विराट भैय्याबरोबर फलंदाजी करतो, तेव्हा मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. आजही आम्ही थोडी चर्चा केली की आम्ही कुठे फटके मारू शकतो.'

'आम्ही ठरवले होते की लाँग-ऑन आणि मिड-ऑफला फटके खेळणे सोपे आहे. त्यावेळी खूप सकारात्मक उर्जा होती. आम्ही चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न करत होतो.'

त्याचबरोबक शिवम दुबेबरोबर झालेल्या भागीदारीबद्दल जयस्वाल म्हणाला, 'कुठे आणि कधी खेळतोय त्यावर अवलंबून आहे. आम्ही दोघेही मोठे फटके खेळतो.' शिवम आणि जयस्वाल हे दोघेही देशांतर्गत क्रिकेट मुंबई संघाकडून खेळतात.

Yashasvi Jaiswal - Virat Kohli
IND vs AFG: 6,6,6...शिवम दुबेचा रुद्रावतार! नबीविरुद्ध ठोकले सलग तीन गगनचुंबी षटकार, Video Viral

याशिवाय पळत जाऊन धावबाद केल्याबद्दल जयस्वाल म्हणाला, 'खरंतर मी गोंधळलो होतो की मी डायरेक्ट हिट करू की नको. त्यानंतर मी विचार केला की मी फारुकीच्या आधी स्टंपपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे मी पळालो आणि बेल्स उडवले.'

रोहितबरोबर झालेल्या चर्चेबद्दल जयस्वाल म्हणाला, 'तो नेहमीच सांगतो की जा आणि तणाव न घेता तुझे शॉट्स खेळ. तो नेहमीच आमच्यासाठी उभा असतो. मला वाटतं की संघात त्याच्यासारखा वरिष्ठ खेळाडू असणे शानदार आहे.'

शेवटी जयस्वाल म्हणाला, 'मला सांगितले आहे की तू जे करतो तेच कर. खरंतर सराव सत्रात कठोर मेहनत करण्याबद्दल आहे. जेव्हाही मला संधी मिळेल, तेव्हा मी संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करेल. आत्ताही मी तेच करत आहे.'

रविवारी झालेल्या सामन्यात जयस्वालशिवाय शिवम दुबेनेही 63 धावांची नाबाद खेळी केली. तसेच विराटने २९ धावा केल्या. त्यामुळे भारताने 173 धावांचे लक्ष्य 15.4 षटकातच पूर्ण करत सामना जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com