IND vs ENG 5th Test: जयस्वाल टीम इंडियाचा फ्युचर स्टार! किंग कोहलीचा मोडला रेकॉर्ड; सिक्सरचा बनला 'बादशाह'

Yashasvi Jaiswal Record: अशा परिस्थितीत त्याने धरमशाला कसोटीत खाते उघडताच या मालिकेत 656 धावा पूर्ण केल्या. यासह तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
Yashasvi Jaiswal Record
Yashasvi Jaiswal Record@BCCI
Published on
Updated on

Yashasvi Jaiswal Record:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यातही भारतीय संघाने आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 218 धावांवर ऑलआऊट झाला. पहिल्याच दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी आला. त्याचवेळी, भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने इतिहास रचला आहे. त्याने असा पराक्रम केला, जो याआधी कोणताही भारतीय फलंदाज करु शकला नाही.

यशस्वी जयस्वालने इतिहास रचला

दरम्यान, हा सामना सुरु होण्यापूर्वी यशस्वी जयस्वालने या मालिकेत 4 सामन्यात 655 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत त्याने धरमशाला कसोटीत खाते उघडताच या मालिकेत 656 धावा पूर्ण केल्या. यासह तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर होता. विराट कोहलीने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या.

Yashasvi Jaiswal Record
IND vs ENG 5th Test: शानदार 5 विकेट्स! इंग्लिश संघावर एकटा कुलदीप 'भारी'; कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकांसह केला मोठा रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय

यशस्वी जयस्वाल - 656+ धावा, 2024

विराट कोहली - 655 धावा, 2016

राहुल द्रविड - 602 धावा, 2002

विराट कोहली - 593 धावा, 2018

विजय मांजरेकर - 586 धावा, 1961

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा

ग्रॅहम गूच - 3 सामने, 752 धावा

जो रुट - 5 सामने, 737 धावा

यशस्वी जयस्वाल - 4 सामने, 656+ धावा*

विराट कोहली - 5 सामने, 655 धावा

मायकेल वॉन - 4 सामने, 615 धावा

Yashasvi Jaiswal Record
IND vs ENG 5th Test: जॉनी बेअरस्टोचा 100व्या कसोटी सामन्यात मोठा पराक्रम; धरमशाला कसोटी ठरली खास

जयस्वालने तेंडुलकरचा ऐतिहासिक विक्रम मोडला

यशस्वी जयस्वाल कसोटी फॉरमॅटमध्येही टी-20 क्रिकेटसारखी धाकड फलंदाजी करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत त्याने आतापर्यंत 26 षटकार मारले आहेत. यासह तो कोणत्याही एका संघाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता. सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 25 षटकार ठोकले होते. मात्र जयस्वालने सचिनचा हा विक्रम एकाच मालिकेत मोडला आहे.

कसोटीत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय

26 षटकार - यशस्वी जयस्वाल विरुद्ध इंग्लंड

25 षटकार - सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया

22 षटकार - रोहित शर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका

21 षटकार - कपिल देव विरुद्ध इंग्लंड

21 षटकार - ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड

Yashasvi Jaiswal Record
IND vs ENG: 23 वर्षीय पडीक्कलचे पदार्पण? बुमराहही करणार पुनरागमन, पाचव्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची 'प्लेइंग-11'

विराट कोहलीचा हा विक्रम मोडला

यशस्वी जयस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 26 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर यशस्वी जयस्वालने केवळ 9 कसोटी सामन्यांमध्ये 29 हून अधिक षटकार ठोकले आहेत.

भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली

दुसरीकडे, या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडलाही चांगली सुरुवात झाली, पण त्याचा फायदा उठवता आला नाही. इंग्लंडचा संघ 57.4 षटके खेळू शकला. तर, भारतीय संघासाठी कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कुलदीप यादवने 15 षटकात 72 धावा देत 5 बळी घेतले. त्याचवेळी, रविचंद्रन अश्विनने 4 विकेट्स घेण्यात यश मिळवले. याशिवाय, रवींद्र जडेजाला 1 बळी मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com