WTC Final: गावस्करांचे मोठे विधान; टॅास अगोदर भारतीय संघात बदल होणार? 

sunil gavaskar.jpg
sunil gavaskar.jpg
Published on: 
Updated on: 

साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे सुरू असलेल्या विश्व कसोटी अजिंमक्यपदासाठी (WTC) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Indian Vs Newzealand) यांच्यात शुक्रवारी सुरु होणार होता. परंतु, पहिल्याच दिवशी पावसाने साऊथहॅम्प्टनचं मैदान झोडपून काढले.  त्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (sunil Gavaskar) यांनी मोठं विधान केलं आहे. गावस्कर म्हणाले खेळपट्टीची स्थिती लक्षात घेता टीम विराट आपल्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. गावस्कर यांनी हे विधान केल्यानंतर आपल्या मुद्द्यावर जोर देत ते म्हणाले ''मी जेव्हा भारताचा कर्णधार होतो तेव्हा मी अशी परिस्थती आली तर प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल करत असे''. नाणेफेक करण्यापूर्वी संघात बदल करण्यामागील कारणही सुनील गावस्कर यांनी दिले. (WTC Final: Gavaskar's big statement; Will there be a change in the Indian team before the toss?)

एका खासगी वाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले की साऊथहॅम्प्टनमधील हवामान वेगवान गोलंदाजांसाठी पोषक आहे आणि अशा परिस्थितीत भारत प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. कोहली आणि व्यवस्थापन इलेव्हनमध्ये विशेष फलंदाज खेळवण्याचा विचार करू शकतात. सुनील गावस्कर पुढे म्हणाले,''भलेही भारतीय संघाने एक दिवस अगोदर संघाची घोषणा केली आहे, परंतु नाणेफेक होण्याच्या अगोदर कोणताही कर्णधार आपल्या संघात बदल करू शकतो. जोपर्यंत एक कर्णधार आपल्या अंतिम संघाची यादी दुसऱ्या कर्णधाराला देत नाही तो पर्यंत संघात बदल होऊ शकतो.      

गावस्कर म्हणाले की, कर्णधार म्हणून मी अशा परिस्थितीमध्ये फिरकी गोलंदाजाला खेळवावे की अतिरिक्त फलंदाजांला याबाबत मी गोंडाळात पडत असे. मी प्रतिस्पर्धी संघाच्या इलेव्हनकडे लक्ष ठेऊन असे. अशा परिस्थितीत नाणेफेक होण्यापूर्वी मी संघाच्या यादीत बदल करत असे. गावस्कर म्हणाले भारताला येथे अतिरिक्त फलंदाजाची गरज भासू शकेल आणि अशा परिस्थितीत नाणेफेक होण्यापूर्वी कधीही इलेव्हन बदलता येऊ शकेल. गावस्कर म्हणाले की त्यामुळे मला असे वाटते की हवामानामुळे भारतीय संघ आणखी एका दुसर्‍या फलंदाजाला खेळायला संधी देईल. येथील परिस्थिती न्यूझीलंडला अनुकूल आहे. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकाचा फलंदाज ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर येऊ शकतो आणि अजून एक अतिरिक्त फलंदाजाला खेळवलं जाऊ शकतं. असे वातावरण पाहता फिरकी गोलंदाजाला बसवून एखाद्या वेगवान गोलंदाजाला खेळवलं  जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com