WTC 2025 Points Table: टीम इंडियाला डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये फायदा; इंग्लंडचा संघ 8व्या स्थानी घसरला!

Team India: सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 434 धावांनी विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

WTC 2025 Points Table: राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यानंतर ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC 2023-25 ​​च्या पॉइंट टेबलमध्ये बदल झाला आहे. टीम इंडियाने मालिकेतील दुसरा सामना जिंकला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 434 धावांनी विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे, मात्र इंग्लंडला मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या या नवीन सायकलच्या पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडच्या (New Zealand) विजयाची टक्केवारी सध्या 75 टक्के आहे, तर टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंत 52.77 टक्के होती, मात्र आता ती वाढून 59.52 झाली आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन संघ सामन्यापूर्वी दुसऱ्या स्थानावर होता, मात्र आता तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. 2023 WTC विजेता संघ ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 55 आहे.

Rohit Sharma
WTC Point Table: दक्षिण आफ्रिका हारली अन् फटका टीम इंडियाला बसला; न्यूझीलंडची पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप

दुसरीकडे, बांगलादेशचा संघ सध्या 50 टक्के सामने जिंकून चौथ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान संघ पाचव्या स्थानावर आहे, ज्याने 36.66 टक्के सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजचा संघ सहाव्या स्थानावर आहे, ज्याने 33.33 टक्के सामने जिंकले आहेत. या सामन्यापूर्वी, इंग्लंडचा (England) संघ सातव्या स्थानावर होता, मात्र आता दक्षिण आफ्रिकेने त्यावर कब्जा केला आहे, कारण दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 25 आहे.

Rohit Sharma
WTC Points-table: भारत-ऑस्ट्रेलियाला पराभवाचे धक्के; पण कांगारुंचे अव्वल स्थान कायम, तर रोहितसेना 'या' क्रमांकावर

तसेच, दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंड संघाची विजयाची टक्केवारी 25 टक्के होती, मात्र आता ती 21.87 वर आली आहे. अशाप्रकारे राजकोटमधील पराभवामुळे इंग्लंडला एक स्थान गमवावे लागले आहे. श्रीलंका संघाचे खाते अद्याप उघडलेले नाही. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये श्रीलंकेने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने गमावले आहेत. अशाप्रकारे श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com