
WPL 2024 Auction Date And Venue: टाटा महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 च्या लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव 9 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. लीगच्या पुढील हंगामासाठी, पाच फ्रँचायझींनी 60 खेळाडूंना कायम ठेवले आहे, ज्यामध्ये 21 परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. त्याचवेळी, त्यांच्या सध्याच्या संघातून 29 खेळाडूंना रिलीज करण्यात आले.
दरम्यान, महिला प्रीमियर लीगची सुरुवात 2023 मध्ये झाली. आयपीएलच्या धर्तीवर सुरु झालेली ही लीग जगातील पहिली लीग आहे, ज्यामध्ये महिला खेळाडूंचा लिलाव झाला. महिला प्रीमियर लीगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या लीगच्या पहिल्याच सत्रात जगभरातील अनेक मोठ्या खेळाडूंनी सहभाग घेतला. महिला आयपीएलच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावण्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला यश आले. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव केला होता.
रिटेन केलेले खेळाडू: अॅलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्ज, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिजने कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तान्या भाटिया, तितास साधू.
रिलीज खेळाडू: अपर्णा मंडल, जसिया अख्तर, तारा नॉरिस.
गुजरात जायंट्स
रिटेन केलेले खेळाडू: ऍशले गार्डनर, बेथ मुनी, डेलन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर.
रिलीज केलेले खेळाडू: अॅनाबेल सदरलँड, अश्वनी कुमारी, जॉर्जिया वेअरहम, हर्ले गाला, किम गर्थ, मानसी जोशी, मोनिका पटेल, पारुनिका सिसोदिया, सबिनेनी मेघना, सोफिया डंकले, सुषमा वर्मा.
रिटेन केलेले खेळाडू: अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतिमनी कलिता, नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया.
रिलीज केलेले खेळाडू: धारा गुजर, हीदर ग्रॅहम, नीलम बिश्त, सोनम यादव.
रिटेन केलेले खेळाडू: आशा शोभना, दिशा कसाट, एलिस परी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन.
रिलीज केलेले खेळाडू: डेन व्हॅन निकेर्क, एरिन बर्न्स, कोमल जंजाड, मेगन शुट, पूनम खेमनार, प्रीती बोस, सहाना पवार.
रिटेन केलेले खेळाडू : अॅलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस. यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा.
रिलीज केलेले खेळाडू : देविका वैद्य, शबनीम इस्माईल, शिवली शिंदे, सिमरन शेख.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.