Video: 20 वर्षीय इंग्लिश गोलंदाज बनली हॅटट्रिक स्टार, WPL फायनलपूर्वी केला घातक रेकॉर्ड

WPL 2023: मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज इझी वाँग हिने स्पर्धेच्या पहिल्या सत्राच्या अंतिम सामन्यापूर्वी इतिहास रचला आहे.
Issy Wong
Issy Wong Dainik Gomantak

WPL 2023: महिला प्रीमियर लीग संपण्यापूर्वीच एक मोठा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सची वेगवान गोलंदाज इझी वाँग हिने स्पर्धेच्या पहिल्या सत्राच्या अंतिम सामन्यापूर्वी इतिहास रचला.

वाँगने डब्ल्यूपीएल ऑफ द टूर्नामेंटची पहिली हॅट्ट्रिक नोंदवून दहशत निर्माण केली आहे. वाँगने फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यूपी वॉरियर्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळत डावाच्या 13व्या षटकात हा अद्भुत पराक्रम केला. तिचे नाव आता कायमचे रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले गेले.

दरम्यान, डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने आधीच आपली पकड मजबूत केली होती.

पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 182 धावा केल्या, त्यानंतर मुंबईने यूपीच्या 4 फलंदाजाना झटपट बाद केले. असे असूनही, विस्फोटक फलंदाज किरण नवगिरे हिने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

Issy Wong
MI vs UP WPL 2023: मोठ्या विजयासह मुंबई इंडियन्स फायनलमध्ये; रविवारी दिल्लीविरूद्ध लढत

13व्या षटकात इतिहास रचला

अशा परिस्थितीत मुंबईला किरणचे तुफान रोखण्याची गरज होती आणि त्यासाठी 13व्या षटकात 20 वर्षीय इंग्लिश वेगवान गोलंदाज वाँगकडे चेंडू सोपवला गेला.

तिने 2 षटकांत पहिल्यांदा किफायतशीर गोलंदाजी केली होती आणि 11 धावा देत अ‍ॅलिसा हिलीची मोठी विकेट घेतली होती. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तिने पहिल्यांदा नवगिरेला बाउंड्रीवर झेलबाद केले. त्यानंतर सिमरन शेखला बाद केले.

Issy Wong
MUM vs DEL, WPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने उडवला मुंबई इंडियन्सचा धुव्वा, 9 षटकात केल्या 110 धावा

संपूर्ण हंगामात वाँगची कामगिरी

वाँगने तिच्या 4 षटकात फक्त 15 धावा दिल्या आणि 4 विकेट घेत यूपीला सामन्यात आघाडी घेण्यापासून पूर्णपणे रोखले.

डब्ल्यूपीएल लिलावात अवघ्या 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत मुंबईच्या संघात आलेली वाँग या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत तिने 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. केवळ विकेटच नाही तर ती सर्वात किफायतशीर गोलंदाजांपैकी एक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com