MI vs UP WPL 2023: मोठ्या विजयासह मुंबई इंडियन्स फायनलमध्ये; रविवारी दिल्लीविरूद्ध लढत

एलिमिनेटर सामन्यात युपी वॉरियर्सवर 72 धावांनी विजय
MI vs UP WPL 2023
MI vs UP WPL 2023Dainik Gomantak

MI vs UP WPL 2023: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सवर मोठा विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईच्या १८२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या युपी संघाचा डाव १७.४ षटकांत ११० धावांत संपुष्टात आला. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना झाला.

गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवून दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम सामन्यात प्रवेशही केला आहे. आता रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स असा अंतिम सामना होईल.

MI vs UP WPL 2023
IPL-2023 चा चॅम्पियन बनणार 'हा' संघ! एक नाही तर ही 3 कारणे...

गुणतालिकेत मुंबई इंडियन्स दुसऱ्या तर युपी वॉरियर्स तिसऱ्या स्थानी होते. विजयासाठी १८३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या युपीची सुरवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात त्यांची सलामीची फलंदाज श्वेता सेहरावत एका धावेवर आऊट झाली.

त्यानंतरच्याच षटकात कर्णधार अॅलिसा हेलीदेखील केवळ ११ धावांवर बाद झाली. युपीकडून किरण नावगिरे (४३), ग्रेस हॅरिस (१४), दीप्ती शर्मा (१६) यांनी झुंज दिली. उर्वरीत फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. १७.४ षटकांत युपी वॉरियर्सचा डाव ११० धावांत संपुष्टात आला.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या. त्यांच्या नताली सीव्हर ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा फटकावल्या. तिने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. अमेलिया केरने १९ चेंडूत २९, हीली मॅथ्यूजने २६ चेंडूत २६ आणि यास्तिका भाटियाने १८ चेंडूत २१ धावा केल्या.

कर्णधार हरमनप्रीत कौरने १५ चेंडूत १४ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने ४ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिली. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने दोन बळी घेतले. अंजली सरवानी आणि पार्श्वी चोप्रा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

MI vs UP WPL 2023
IPL 2023: आयपीएलमधील 'हा' मोठा रेकॉर्ड किंग कोहली करणार ध्वस्त! अलीकडील...

वाँगची हॅटट्रिक

दरम्यान, इस्सी वाँगने महिला प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला. युपी वॉरियर्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात तिने हॅटट्रिक घेतली. अशी कामगिरी करणारी ती या स्पर्धेतील पहिली गोलंदाज ठरली आहे. वाँगने १३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर किरण नवगिरेला बाद करून मुंबईला मोठे यश मिळवून दिले.

त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर वाँगने सिमरन शेखला क्लीन बोल्ड केले. तर त्यानंतर चौथ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनला क्लीन बोल्ड करून वोंगने हॅट्ट्रिक पूर्ण केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com