World Cup: वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, विराटशी पंगा घेणारा खेळाडू 2 वर्षांनंतर संघात परतला

एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup-2023) या वर्षी 5 ऑक्टोबरपासून भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे.
Afghanistan Team
Afghanistan TeamDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup Squad Announced: एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup-2023) या वर्षी 5 ऑक्टोबरपासून भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे. यातच, अफगाणिस्तानने या आयसीसी स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 2 वर्षानंतर एक वेगवान गोलंदाज संघात परतला आहे.

15 जणांची टीम जाहीर

पुढील महिन्यात भारतात सुरु होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी अफगाणिस्तानने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

वेगवान गोलंदाज नवीन उल हकचे संघात पुनरागमन झाले आहे. नवीन उल हकने दोन वर्षांनंतर प्रथमच वनडे संघात स्थान मिळवले आहे.

जानेवारी 2021 मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 बळी घेतले आहेत, ज्यात 42 धावांत 4 विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Afghanistan Team
ODI World Cup पूर्वी टीम इंडियाला नंबर 1 बनण्याची सुवर्णसंधी, करावं लागले 'हे' काम!

या स्टारला कर्णधारपद मिळाले

मधल्या फळीतील फलंदाज हशमतुल्ला शाहिदी विश्वचषकात अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचे नेतृत्व करणार आहे. नवीन उल हक व्यतिरिक्त वेगवान गोलंदाजीमध्ये फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि अजमतुल्ला उमरझाई यांचा समावेश आहे. मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांच्यासोबत फिरकी आक्रमणाचे नेतृत्व राशिद खान करेल.

या खेळाडूंना स्थान मिळाले नाही

फलंदाजीत, टॉप ऑर्डरमध्ये रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान आणि रहमत शाह यांचा समावेश आहे तर कर्णधार शाहिदी आणि नजीबुल्ला झद्रान मधल्या फळीत असतील. करीम जनात, मोहम्मद सलीम, शरफुद्दीन अश्रफ आणि सुलीमान साफी यांना विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही.

Afghanistan Team
World Cup 2023: 'तो जगातील दुसऱ्या संघात असता, तर प्लेइंग-11मध्ये असता' भारताच्या संघनिवडीवर भज्जी बरसला

अफगाणिस्तान संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), अजमातुल्ला उमरझाई, राशिद खान (Rashid Khan), मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com