World Cup 2023 Final: हसीन जहाँ म्हणते, चांगले लोक जिंकतात... व्हिडिओवर संतापले लोक!

World Cup 2023 Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या भारताच्या पराभवानंतर करोडो चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Mohammed Shami & Hasin Jahan
Mohammed Shami & Hasin Jahan Dainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023 Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या भारताच्या पराभवानंतर करोडो चाहत्यांना मोठा धक्का बसला. विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात रोहित ब्रिगेड यशस्वी होईल अशी आशा भारतीय चाहत्यांना होती पण तसे झाले नाही.

जेतेपदाच्या लढाईत भारताला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाच्या हातातून ट्रॉफी निसटल्यानंतर खेळाडू आणि चाहत्यांचे डोळे भरुन आले. त्याचवेळी, हसीन जहाँने इन्स्टाग्रामवर असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर अनेकांनी संताप व्यक्त करत तिला टीम इंडियासाठी पनौती म्हटले आहे.

दरम्यान, हसीन जहाँ आणि टीम इंडियाचा (Team India) स्टार अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वेगळे झाले आहेत. या दोघांनी 2014 मध्ये लग्न केले होते. दोघांना एक मुलगीही आहे.

हसीन जहाँने 2018 मध्ये शमीवर घरगुती हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले होते. तिने सोमवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानच्या आवाजातील एक डॉयलॉग आहे. व्हिडिओमध्ये हसीन जहाँ म्हणते की, ''कितने भी दुख आएं, कितने भी गम आएं। कितनी ऊंचाई आए, कितनी भी नींचाई आए। आखिर में अच्छे लोग जरुरत जीतते हैं।''

Mohammed Shami & Hasin Jahan
World Cup 2023 Final: ''आमचा दिवस नव्हता...'' PM मोदींना पाहताच शमीला अश्रू अनावर

दुसरीकडे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपली नाराजी व्यक्त केली. एका यूजरने लिहिले की, "या पनौतीमुळे टीम इंडियाचा पराभव झाला." दुसरा म्हणाला, "तुला म्हणायचे आहे की ऑस्ट्रेलियन हेच ​​चांगले लोक आहेत." इतर म्हणाले, ''शमीने वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने कमी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तो खरा हिरो.”

Mohammed Shami & Hasin Jahan
World Cup 2023 Final: केएल राहुलच्या नावावर मोठा विक्रम, वर्ल्ड कपमध्ये केली विशेष कामगिरी!

विशेष म्हणजे, शमीला स्पर्धेतील पहिले चार सामने बाहेर बसावे लागले होते. मात्र त्याला संधी मिळताच त्याने खळबळ उडवून दिली. शमीने 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या. 2023 च्या विश्वचषक (World Cup) स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झाम्पा याने 11 सामन्यांत 23 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com