WT20 WC: द. अफ्रिका इतिहास रचणार की ऑस्ट्रेलिया मारणार विजेतेपदाचा षटकार? फायनलच्या Details घ्या जाणून

महिला टी20 वर्ल्डकपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडणार आहे.
Australia Women vs South Africa Women | Women's T20 World Cup 2023
Australia Women vs South Africa Women | Women's T20 World Cup 2023Dainik Gomantak

Australia Women vs South Africa Women, Final: महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा रविवारी (26 फेब्रुवारी) अंतिम सामना खेळवण्यात येणार असून हा सामना ऑस्ट्रेलियन महिला विरुद्ध दक्षिण अफ्रिकन महिला संघात खेळवण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाचा सलग सातव्यांदा महिला टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात खेळत आहेत. त्यांनी यापूर्वी पाचवेळा विजेतेपदालाही गवसणी घातली आहे. त्यामुळे यंदा ते सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या हेतूने अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील.

ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 साली टी20 विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Australia Women vs South Africa Women | Women's T20 World Cup 2023
INDW vs AUSW: तोच हा क्षण, जेव्हा भारतापासून T20 WC दुरावला! पाहा 52 धावांवर कशी रनआऊट झाली हरमनप्रीत

तसेच दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच अंतिम सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या महिला आणि पुरुष वरिष्ठ संघासाठी हा वर्ल्डकपमधील पहिलाच अंतिम सामना आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा ऐतिहासिक सामना आहे.

विशेष म्हणजे हा सामना घरच्या चाहत्यांसमोर घरच्या मैदानात खेळण्याची संधी दक्षिण अफ्रिकेच्या महिला संघाला मिळाली आहे. त्यामुळे घरच्या चाहत्यांसमोर पहिले विश्वविजेतेपद उंचावण्याच्या हेतूनेच दक्षिण अफ्रिकेचा संघ मैदानात उतरणार आहे.

दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकप अंतिम सामन्याचा तपशील

1. दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना किती तारखेला होणार आहे?

दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

2. दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना कोठे खेळवला जाईल?

दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे.

Australia Women vs South Africa Women | Women's T20 World Cup 2023
Women's T20 World Cup: इंग्लंडचा स्वप्नभंग! यजमान दक्षिण अफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये

3. दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना किती वाजता खेळवला जाईल?

दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल.

4. दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता?

दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकता.

5. दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना तुम्ही 'डिज्नी+हॉटस्टार' ऍपवर पाहू शकता.

यातून निवडली जाईल प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया महिला संघ - बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी, मेग लॅनिंग (कर्णधार), ऍशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेअरहॅम, ऍनाबेल सदरलँड, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन, एलिसा हिली (यष्टीरक्षक), हिदर ग्रॅहम, जेस जोनासेन, किम गर्थ

दक्षिण आफ्रिका संघ - लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, मॅरिझन कॅप, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, सुन लुस(कर्णधार), ऍनेक बॉश, सिनालो जाफ्ता(यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको एमलाबा, मसाबता क्लास, लारा गुडॉल, डेल्मी टकर, ऍनेरी डेर्कसेन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com