Ind vs WI: दीप्ती शर्माने रचला इतिहास, 100 T20I विकेट घेणारी ठरली भारताची पहिली गोलंदाज

Women’s T20 World Cup: आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ब गटातील महत्त्वाच्या सामन्यात तिने हा टप्पा गाठला.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs West indies, Women’s T20 World Cup: भारताची स्टार फिरकीपटू दीप्ती शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या T20 विश्वचषक 2023 सामन्यात मोठी कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ब गटातील महत्त्वाच्या सामन्यात तिने हा टप्पा गाठला. लेगस्पिनर पूनम यादवला मागे टाकत दीप्तीने ही कामगिरी केली.

दरम्यान, दीप्ती शर्मा (Deepti Sharma) ही T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 विकेट घेणारी पहिली भारतीय गोलंदाज आहे. यासह, ती अनीसा मोहम्मद, निदा दार, एलिस पेरी, शबनीम इस्माईल, मेगन शुट, कॅथरीन ब्रंट, सोफी डेव्हाईन आणि अन्या श्रबसोल यांच्यानंतर महिला क्रिकेटमधील नववी गोलंदाज ठरली आहे, जिने T20I मध्ये 100 बळी घेतले आहेत.

Team India
Ind Vs WI: रोहित शर्मा बनला ड्रायव्हर, टीम इंडियाचा स्टंट झाला व्हायरल- Video

तसेच, दीप्ती शर्मा व्यतिरिक्त, पूनम यादव (98), राधा यादव (67), राजेश्वरी गायकवाड (58), झुलन गोस्वामी (56) आणि एकता बिश्त (53) महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाज आहेत. पुरुष क्रिकेटमध्ये, यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal) हा या फॉरमॅटमध्ये भारतासाठी (India) सर्वाधिक विकेट घेणारा (91) गोलंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com