WPL 2023 Final: फुलटॉस, स्वीप शॉट अन् खराब फिल्डिंग... दिल्लीला मुंबईविरुद्ध 'या' 5 चूका पडल्या महागात

वूमन्स प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या झालेल्या पराभवामागे कोणती 5 कारणे असू शकतात, याचा घेतलेला आढावा.
Nat Sciver-Brunt
Nat Sciver-BruntDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Capitals vs Mumbai Indians Final: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. रविवारी झालेल्या या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह मुंबई इंडियन्स डब्ल्यूपीएलचे विजेतेपद जिंकणारा पहिला संघ ठरला.

या सामन्यात दिल्लीने मुंबईसमोर 132 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 19.3 षटकात ३ विकेट्स गमावत 134 धावा करत पूर्ण केला. दरम्यान, रोमांचक झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या पराभवाची काय 5 कारणे असू शकतात, याचा आढावा घेऊ.

Nat Sciver-Brunt
WPL 2023: ऑरेंज कॅप लेनिंगला, तर पर्पल कॅप मॅथ्यूजला; पाहा शर्यतीत राहिलेल्या टॉप 5 जणींची लिस्ट

1. फुलटॉल, स्वीप शॉट अन् खराब फिल्डिंग

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण धीम्या गतीच्या या खेळपट्टीवर सुरुवातील मुंबईने फुलटॉसचे अस्त्र वापरले. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात इजी वाँगने फुलटॉसवर शफाली वर्माला 11 धावांवर माघारी धाडले. दरम्यान, हा चेंडू वादग्रस्त ठरला असला, तरी त्यावर शफलीला विकेट गमावावी लागली होती.

तिच्यानंतर वाँगने जेमिमाह रोड्रिग्स आणि ऍलिस कॅप्सी यांनाही फुलटॉसवर बाद केले. त्यामुळे दिल्लीला सुरुवातीलाच मोठे धक्के बसल्याने त्यातून सावरणे कठीण गेले.

तसेच त्यानंतर दिल्लीचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अन्य खेळाडूंनी स्वीप शॉट मारण्याला पसंती दिली, त्यामुळे काही चौकार मुंबईला मिळाले. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणादरम्यान दिल्लीकडून काही चूका झाल्या, ज्या त्यांना अखेरीस महागात पडल्या.

Nat Sciver-Brunt
WPL 2023: मुंबई-दिल्लीला कोटींचे बक्षीस, तर पुरस्कार विजेतेही लखपती; संपूर्ण लिस्ट पाहा एका क्लिकवर

2. वाँगने दिलेल्या धक्क्यातून सावरणे कठीण

वाँगने दिल्लीच्या सुरुवातीच्या तीन विकेट्स 5 षटकांच्या आतच 35 धावातच घेतल्या होत्या, त्यामुळे त्यातून दिल्लीला सावरणे कठीण गेले. तिने घेतलेल्या विकेट्समुळे दिल्लीला त्यांच्या धावगतीवर लगाम लागला. त्यामुळे दिल्ली मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत.

3. लेनिंग धावबाद

एका बाजूने सुरुवातीला विकेट जात असताना दिल्लीचा डाव मेग लेनिंगने सांभाळला होता. पण जेस जोनासनबरोबर फलंदाजी करत असताना एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 12 व्या षटकात लेनिंग 35 धावांवर धावबाद झाली. ती बाद झाली तेव्हा दिल्लीच्या 5 बाद 74 धावा झाल्या होत्या.

त्यानंतर मात्र दिल्ली संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. दिल्लीने पुढच्या 4 विकेट्स अवघ्या 5 धावांत गमावल्या. हेली मॅथ्यूज आणि एमेलिया केरने दिल्लीच्या खालच्या फळीला टिकूच दिले नाही. त्यामुळे जर लेनिंग धावबाद झाली नसती आणि तिने एक बाजू सांभाळली असती, तर कदाचीत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली असती.

तरी राधा यादव (27*) आणि शिखा पांडे (27*) यांनी अखेरच्या विकेटसाठी नाबाद 52 धावांची भागीदारी केली. त्यामुळे किमान दिल्लीला 131 धावांपर्यंत पोहचता आले.

Nat Sciver-Brunt
WPL 2023 Final: मुंबईच्या पोरींनी मारलं फायनलचं मैदान! विजयी चौकार ठोकताच टीमचा जल्लोष, Video एकदा पाहाच

4. हरमनप्रीत आणि नतालियाची भागीदारी

दिल्लीने दिलेल्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने देखील 2 विकेट्स झटपट गमावल्या होत्या. पण हरमनप्रीत कौर आणि नतालिया स्किव्हर-ब्रंट यांनी मुंबईचा डाव सावरला. त्यांनी दिल्लीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर संयमी फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण 72 धावांची भागीदारी केली. त्यामुळे अखेरीस हरमनप्रीत 37 धावांवर धावबाद झाल्यानंतरही विकेट्स हातात असल्याने मुंबईला आक्रमण करणे सोपे गेले.

5. जेस जोनासनची 19 वी ओव्हर ठरली महागात

हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतरही मुंबईसाठी विजय सोपा झाला नव्हता. कारण अखेरच्या 12 चेंडूत मुंबईला 21 धावांची गरज होती. पण 19 व्या षटकात नतालिया आणि एमेलियाने जेस जोनासनच्या गोलंदाजीवर ३ चौकार ठोकत एकूण 16 धावा काढल्या. त्यामुळे मुंबईला अखेरच्या षटकात केवळ 5 धावांचीच आवश्यकता होती. या पाच धावा मुंबईने पहिल्या तीन चेंडूतच काढल्या.

6. नतालियाची संयमी खेळी

दिल्लीने गोलंदाजीवेळी धावगतीवर नियंत्रण ठेवलेले असले, तरी एक बाजू नतालियाने चांगली सांभाळली होती. तिने संयमी खेळ करत धावफलक हलता ठेवला होता. त्यामुळे विजय मुंबईच्या आवाक्याबाहेर कधीही गेला नव्हता.

नतालियानेच अखेरच्या षटकात विजयी चौकारही ठोकला. तिने 55 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी करत मुंबईला विजयापर्यंत पोहचवले. ती या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com