जुआन फेरांडोच्या F C गोवाचे नेमके चूकले कुठे

जुआन फेरांडोचा (Juan Ferrando's) मागिल सिझन आश्वासक होता. यंदाही चाहत्यांना आणि क्लबला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
ISL च्या या मोसमातील पहिले तीनही सामने गमाविल्याने F C गोवाने (FC Goa) गमाविल्याने त्यांच्या स्वप्नाचा भंग झाला आहे.
ISL च्या या मोसमातील पहिले तीनही सामने गमाविल्याने F C गोवाने (FC Goa) गमाविल्याने त्यांच्या स्वप्नाचा भंग झाला आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

FC गोवा (FC Goa) 2021-22 हंगाम सुरू होण्यापूर्वी इंडियन सुपर लीग (Indian Super League) जेतेपदासाठी प्रमुख दावेदारांपैकी एक असल्याचे मानले जात होते. एएफसी (AFC) चॅम्पियन्स लीगमध्ये या संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. मागील हंगामातील खेळाडूंना संघात कायम ठेवला आहे. जुआन फेरांडोचा (Juan Ferrando's) मागिल सिझन आश्वासक होता. यंदाही चाहत्यांना आणि क्लबला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

ISL च्या या मोसमातील पहिले तीनही सामने गमाविल्याने F C गोवाने (FC Goa) गमाविल्याने त्यांच्या स्वप्नाचा भंग झाला आहे.
विराट कोहलीने केले FC Goa चे अभिनंदन

मात्र, ISL च्या या मोसमातील पहिले तीनही सामने गमाविल्याने F C गोवाने (FC Goa) गमाविल्याने त्यांच्या स्वप्नाचा भंग झाला आहे. एफसी गोवाने त्यांच्या चालू हंगामात मुंबई सिटी एफसी, जमशेदपूर एफसी आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघांविरुद्ध गमावले आहेत. त्यांची प्रत्येक सामन्यातील कामगिरी ढासाळत गेली आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यांमध्ये FC गोवाने आपला खेळ उंचाविला नाही तर त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण होऊ शकते.

ISL च्या या मोसमातील पहिले तीनही सामने गमाविल्याने F C गोवाने (FC Goa) गमाविल्याने त्यांच्या स्वप्नाचा भंग झाला आहे.
FC Goa समोर मैदानाचे आव्हान

या हंगामाच्या खराब सुरुवातीस अनेक घटक कारणीभूत

जुआन फेरांडोकडून चूकलेली संघ निवड ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. गॅफरला र्स्टटिंग लाइनअप कोणती आहे ते अद्यापही समजलेले नाही. केवळ चार परदेशी संघात खेळण्याची मुभा असल्याच्या या नवीन नियमामुळे FC गोवा संघाच्या योजनांना धक्का बसला आहे. संघातील भारतीय खेळाडूंना सेंटर बॅक आणि डिफेंडींगचा अनुभव नसल्याने तेथे गोवा संघ कमकुवत बनत आहे. इव्हान गोन्झालेझला पहिल्या दोन सामन्यांमध्ये लालमंगाईहसांगा आणि आयबान डोहलिंग यांच्यातील ताळमेळात कमतरता जाणविल्याने समोरील संघाने गोवा संघावर गोल केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com