VIDEO: खेळपट्टी की मृत्यूचा सापळा? हेल्मेटला चेंडू लागताच फलंदाज जमिनीवर कोसळला अन् थेट रुग्णालयात पोहोचला; धोकादायक पीचमुळे सामना रद्द

Jeremiah Louis Helmet Injury Video: वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत चॅम्पियनशिपमध्ये असाच एक थरारक आणि भीतीदायक प्रकार समोर आला.
Jeremiah Louis Helmet Injury Video
Jeremiah Louis Helmet InjuryDainik Gomantak
Published on
Updated on

West Indies Championship 2026 Dangerous Pitch: क्रिकेटच्या मैदानात दुखापत होणे ही नवीन बाब नाही, परंतु जेव्हा खेळपट्टी इतकी जीवघेणी ठरते की फलंदाजाला थेट स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्याची वेळ येते, तेव्हा क्रिकेट विश्वात खळबळ उडणे स्वाभाविक आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत चॅम्पियनशिपमध्ये असाच एक थरारक आणि भीतीदायक प्रकार समोर आला. अँटिग्वा येथील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर त्रिनिदाद अँड टोबॅगो विरुद्ध लीवर्ड आयलंड्स यांच्यात सुरु असलेला सामना खेळपट्टीच्या धोकादायक स्वरुपामुळे तिसऱ्याच दिवशी रद्द करावा लागला.

या सामन्यात वेगवान गोलंदाज जेडन सील्सचा एक उसळता चेंडू फलंदाज जेरेमिया लुईसच्या हेलमेटवर अत्यंत वेगाने आदळला. चेंडूचा वेग आणि उसळी इतकी अनपेक्षित होती की लुईस सावरण्यापूर्वीच त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर दुखापतीच्या वेदना आणि खेळपट्टीच्या दुरवस्थेमुळे लुईस प्रचंड संतापलेला दिसला. त्याने संताप व्यक्त करताना मैदानात पाय आदळले आणि आपले हेल्मेट फुटबॉलप्रमाणे लाथेने उडवून दिले. मात्र, त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला तात्काळ स्ट्रेचरवरुन बाहेर नेण्यात आले आणि नंतर रुग्णवाहिकेने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. सुदैवाने, वैद्यकीय तपासणीनंतर त्याची प्रकृती आता स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले.

Jeremiah Louis Helmet Injury Video
West Indies vs Zimbabwe: वानखेडेवर षटकारांचं पाऊस! विंडीज-झिम्बाब्वे सामन्यात मोडला 12 वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; पहिल्यांदाच घडला 'असा' चमत्कार VIDEO

या घटनेनंतर पंच आणि मॅच रेफरी यांनी बराच वेळ चर्चा केली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे म्हणजे खेळाडूंच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी दोन्ही संघांचे कर्णधार जोशुआ डिसिल्वा आणि जस्टिन ग्रीव्ह्स यांना बोलावून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत तब्बल 27 गडी बाद झाले होते, ज्यावरुन खेळपट्टीवर चेंडू किती उसळत होता, याचा अंदाज येतो. अवघ्या 147 षटकांच्या खेळात इतके गडी बाद होणे आणि खेळाडू जखमी होणे यामुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या मैदानावर पुढील सामने खेळवण्यापूर्वी खेळपट्टीची कसून तपासणी केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com