India vs West Indies: वेस्ट इंडिजसाठी 21 वर्षांचा दुष्काळ कायम! दोन दशकांपासून भारतीय संघाचेच 'वर्चस्व'

IND vs WI: वेस्ट इंडिजला भारतीय संघाने कसोटी मालिकेत मात दिल्याने त्यांची दोन दशकांची प्रतिक्षा कायम राहिली आहे.
West Indies vs India
West Indies vs IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

West Indies vs India, Test Series: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात नुकतीच कसोटी मालिका झाली. ही मालिका भारताने 1-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील डॉमिनिकाला झालेला पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. तसेच त्रिनिदादला झालेला दुसरा सामना अनिर्णित राहिला.

त्रिनिदादला झालेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे चौथ्या दिवशी ज्या धावसंख्येवर सामना थांबला होता. त्याच धावसंख्येवर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. त्यामुळे पहिला सामना भारताने जिंकला असल्याने मालिकाही खिशात घातली.

West Indies vs India
IND vs WI: भारताने कसोटी मालिका जिंकली, पण WTC पॉइंट्सटेबलमध्ये गमवावे लागले अव्वल स्थान

दरम्यान भारताने मालिका जिंकली असल्याने वेस्ट इंडिजची भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील विजयाची प्रतिक्षा कायम राहिली आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध अखेरीस 2002 साली कसोटी मालिकेत विजय मिळवला होता.

त्यावेळी वेस्ट इंडिजचे कर्णधारपद कार्ल हुपरकडे होते. तसेच त्यांच्या संघात शिवनारायण चंद्रपॉल, ब्रायन लारा, ख्रिस गेल, रामनरेश सारवान असे खेळाडू होते. विशेष म्हणजे नुकतेच भारताविरुद्ध खेळलेल्या वेस्ट इंडिज संघात शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉलही खेळला.

साल 2002 मध्ये झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. ही मालिका कॅरेबियन बेटांवरच झाली होती. त्यानंतर या दोन संघात 9 कसोटी मालिका झाल्या. पण एकाही मालिकेत वेस्ट इंडिजला विजय मिळवता आला नाही.

West Indies vs India
IND vs WI, 2nd Test: अखेरच्या दिवशी पावसाचाच खेळ! विंडिजविरुद्ध सामना 'ड्रॉ', पण मालिका भारताच्या खिशात

दुसरा कसोटी सामना अनिर्णित

खरंतर त्रिनिदादला झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचे वर्चस्व होते. पण पावसाने अडथळा आणल्याने सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकात 2 बाद 76 धावा केल्या होत्या.

तसेच शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी 289 धावांची गरज होती, तर भारताला 8 विकेट्सची गरज होती. पण, शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही. त्यामुळे याच धावसंख्येवर सामना अनिर्णित राहिला.

तत्पुर्वी या सामन्यात भारताने पहिल्या डावात 128 षटकात सर्वबाद 438 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 115.4 षटकात सर्वबाद 255 धावा केल्या. त्यामुळे भारताला 183 धावांची मोठी आघाडी मिळाली होती.

भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंजदाजी केली आणि हा डाव 24 षटकात 2 बाद 181 धावा करत घोषित केला. त्यामुळे भारताने पहिल्या डावातील आघाडीसह वेस्ट इंडिजसमोर 365 धावांचे आव्हान ठेवले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com