Sourav Ganguly: गांगुलीच्या सुरक्षेत वाढ! आता मिळणार Z सेक्युरिटी, पण का? जाणून घ्या

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Sourav Ganguly
Sourav GangulyDainik Gomantak

Sourav Ganguly's security cover upgrade to Z category: भारताचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भारतातील लोकप्रिय सेलिब्रेटिंपैकी एक आहे. त्याचा मोठा चाहतावर्गही भारतात आढळतो. त्याचे व्यक्तीमत्त्व पाहाता पश्चिम बंगाल सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचे ठरवले आहे.

आता सौरव गांगुलीला झेड (Z) श्रेणीतील सुरक्षा पुरवली जाणार आहे. याबद्दल एका सिनियर ऑफिसरने माहिती दिली असून गांगुलीला यापूर्वी देण्यात आलेल्या वाय (Y) श्रेणीच्या सुरक्षेची मुदत संपल्यानंतर मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की 'व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेची मुदत संपल्यानंतर नियमानुसार सुरक्षेबाबत पुनरावलोकन करण्यात आले. त्यानंतर गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

Sourav Ganguly
Sourav Ganguly: ''सौरव गांगुलीला ICC निवडणूक लढवण्याची परवानगी द्या'' ममता बॅनर्जींचे मोदींना आवाहन

नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार आता गांगुलीबरोबर 8 ते 10 पोलीस कर्मचारी असतील. यापूर्वी वाय श्रेणीतील सुरक्षेनुसार त्याच्या सुरक्षेसाठी विशेष शाखेचे तीन पोलीस अधिकारी आणि त्याच्या बेहाला निवासस्थानाचे रक्षण करणारे तीन पोलीस कर्मचारी मिळायचे.

मंगळवारी पश्चिम बंगाल सचिवालयाचे प्रतिनिधी गांगुलीच्या बेहाला ऑफिसमध्ये गेले होते. तिथे त्यांची कोलकाता पोलीस लालबाजार मुख्यालयातील आणि स्थानिक पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांशी बैठक झाली.

अधिकाऱ्याने सांगितले, 'गांगुली सध्या त्यांच्या दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर प्रवास करत आहे. तो कोलकाताला 21 मे रोजी येणार आहे. तो आल्याच्या दिवलापासून त्याला झेड श्रेणीची सुरक्षा पुरवली जाईल.'

गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाचा क्रिकेट संचालक आहे. त्यामुळे तो आयपीएल 2023 साठी दिल्ली संघाबरोबर आहे.

Sourav Ganguly
Sourav Ganguly News: सौरव गांगुलीने राजीनाम्याच्या मुद्यावर सोडले मौन

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल सीव्ही आनंदा बोस आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली जाते.

तसेच फिरहात हाकिम आणि मोलोय घातक अशा नेत्यांना झेड सुरक्षा पुरवी जाते. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष सुकांता मुजूमदार यांना सीआयएसएफ संरक्षणासह झेड प्लस सुरक्षा दिली जाते.

गांगुलीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये 113 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 7212 धावा केल्या आहेत, तसेच 311 वनडे सामन्यांमध्ये त्याने 11363 धावा कल्या आहेत. त्याचे कसोटीत 16 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत. वनडेत गांगुलीच्या नावावर 22 शतके आणि 72 अर्धशतके आहेत.

याशिवाय गांगुलीने कसोटीत 32 विकेट्स आणि वनडेत 100 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com