Cristiano Ronaldo Vs Wayne Rooney: वेन रूनी माझ्यावर जळतो; फिफा वर्ल्डकपपुर्वी रोनाल्डोच्या मुलाखतीवरून वाद

रूनी म्हणतो, मुलाखत पाहून क्लबच घेईल कारवाईचा निर्णय
Cristiano Ronaldo Vs Wayne Rooney
Cristiano Ronaldo Vs Wayne RooneyDainik Gomantak

Cristiano Ronaldo Vs Wayne Rooney: पोर्तुगालचा खेळाडू आणि मँचेस्टर युनायडेट क्लबचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू वेन रूनी भडकला आहे. याचे कारण आहे, रोनाल्डोने ब्रिटिश पत्रकार पियर्स मॉर्गन (Pierce Morgan) यांना दिलेली मुलाखत.

Cristiano Ronaldo Vs Wayne Rooney
FIFA WC Opening Ceremony: फिफा वर्ल्डकपचे सामने, ओपनिंग सेरेमनी भारतात कुठे पाहाल?

ही मुलाखत खूप चर्चेत आली आहे. या मुलाखतीत रोनाल्डोने फुटबॉल क्लबच्या मालकांसह मॅनेजर एरिक टेन हॅग यांच्यावर टीका केली होती. रोनाल्डोने त्याच्यासोबत झालेल्या वतर्नावरून टिका केली होती. याशिवाय ज्या खेळाडुंनी क्लबमध्ये असताना टीका केली होती, त्यांची नावेही रोनाल्डोने या मुलाखतीत सांगितली होती.

रूनी सध्या डीसी युनायडेटचा मुख्य प्रशिक्षक आहे. याशिवाय रेड डेव्हिल्सचा तो माजी खेळाडू आहे. रूनी आणि रोनाल्डो हे दोघेही मँचेस्टर युनायडेट क्लबसाठी एकत्रित खेळले आहेत. रूनी याने रोनाल्डोचा फॉर्म आणि त्याच्या वर्तनावरून टीका केली होती. त्याने रोनाल्डोला क्लबने विकून टाकावे, असा पर्यायही दिला होता. रोनाल्डो याला क्लब सोडायचा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने यंदाच्या व्यावसायिक लीग फुटबॉल हंगामात प्रीमियर लीग मॅचमध्ये कशी सुरवात केली, हेदेखील सर्वांना माहिती आहे, असे रूनी म्हणाला होता.

Cristiano Ronaldo Vs Wayne Rooney
FIFA World Cup 2022: फाईव्हस्टार हॉटेल सोडून कतार विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये का राहतोय मेस्सीचा अर्जेंटिना संघ?

रूनी म्हणाला की, रोनाल्डो एक चांगला खेळाडू आहे. फुटबॉलमध्ये रोनाल्डो आणि मेस्सी हे दोघे सर्वोत्तम प्लेयर आहेत. वाढते वय सर्वांसाठीच असते. क्रिस्तियानोला या वाढत्या वयाचा सामना करताना अडचणी येत आहेत. त्याने एका मुलाखतीत केलेली वक्तव्ये विचित्र होती. तथापि, मला हे माहिती आहे की, जेव्हा मँचेस्टर युनायटेड ही मुलाखत पाहतील तेव्हा तेच रोनाल्डोला जाब विचारतील. आणि जर त्यांना कारवाई करायची असेल तर गरजेनुसार तशी कारवाईही करतील.

रूनीवर पलटवार करताना रोनाल्डो म्हणाला की, मला कळत नाही की इंग्लंडच्या माजी फुटबॉलपटूला या गोष्टी आत्ता करायची काय गरज आहे. रूनी माझ्यावर जळतो, असेही रोनाल्डो म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com